Kapus Bajarbhav : कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी कही खुशी तो कही गम अशी परिस्थिती सध्या राज्यात पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी कापूस बाजार भावाने सरासरी साडेनऊ हजार रुपये प्रति क्विंटलचा पल्ला गाठला आहे, तर काही ठिकाणी कापसाला सरासरी बाजार भाव आठ हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा कमी मिळत आहे.
अशा परिस्थितीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर संमिश्र भाव आहेत. यांच्या ठिकाणी कापसाला विक्रमी दर मिळत आहे त्या शेतकरी बांधवांना दर कायम राहण्याबाबत शंका निर्माण होत आहे. खरं पाहता गेल्या दोन आठवड्यापासून कापसाच्या दरात वाढ होत आहे.
मात्र आज खानदेश मध्ये कापूस दरात घसरण पाहायला मिळाली. यामुळे कापूस पंढरी खानदेश मध्ये कापूस दरात झालेली घसरण शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवत आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला काय दर मिळत आहे याविषयी सविस्तर पण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सावनेर कृषी उत्पन्न बाजार समिती :- सावनेर एपीएमसी मध्ये आज 3300 क्विंटल कापसाची आवक झाली. या एपीएमसीमध्ये आज सर्वाधिक आवक नमूद करण्यात आली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कापसाला 8900 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 9000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव आठ हजार 950 रुपये नमूद करण्यात आला आहे.
आर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती :- एच4 मध्यम स्टेपल कापसाची या एपीएमसी मध्ये 477 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला नऊ हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 9500 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 9400 नमूद करण्यात आला आहे.
बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज मध्यम स्टेपलं कापसाची 59 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कापसाला सात हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 8990 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव आठ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज साडेतीनशे क्विंटल मध्यम स्टेपल कापसाचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला 8,900 रुपये प्रति क्विंटल किमान बाजार भाव मिळाला असून 9200 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 9080 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
यावल कृषी उत्पन्न बाजार समिती :- खानदेशातील यावल एपीएमसीमध्ये आज 30 क्विंटल मध्यम स्टेपल कापसाची आवक झाली. आज या एपीएमसी मध्ये 7290 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजारभाव कापसाला मिळाला असून 8380 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 7940 रुपये नमूद करण्यात आला आहे.