Kapus Bajarbhav : मित्रांनो कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणारे एक मुख्य नगदी पीक आहे. खरं पाहता गेल्यावर्षी कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी कापसाचे पीक मोठे लकी ठरले होते. यावर्षी कापसाला कधी नव्हे तो उच्चांकी बाजार भाव मिळाला असल्याने कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक फायदा झाला होता. अशा परिस्थितीत यावर्षी कापसाच्या लागवडीखालीलक्षेत्रात वाढ झाली आहे.
मात्र, यावर्षी मुहूर्ताचा काही कालावधी वगळता कापसाला खूपच कमी बाजार भाव मिळाला आहे. यामुळे यावर्षी देखील कापसाला उच्चांकी बाजार भाव मिळेल अशी शेतकऱ्यांची आशा फुल ठरली आहे. सध्या कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळत आहे. अशा परिस्थितीत सद्यस्थितीत मिळत असलेला बाजारभाव कापूस उत्पादक शेतकरी बांधवांच्या अपेक्षेप्रमाणे नसून या बाजारभावात कापूस पिकासाठी झालेला खर्च काढणे मुश्कील असल्याचे शेतकरी बांधव नमूद करत आहेत.
कापूस उत्पादक शेतकरी बांधवांच्या मते, यावर्षी हवामान बदलामुळे आणि पावसाच्या लहरीपणामुळे कापूस उत्पादित करण्यासाठी अधिकचा उत्पादन खर्च करावा लागला आहे. मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाच्या पिकाला मोठा फटका बसला होता. शिवाय कापूस पीक अंतिम टप्प्यात असताना परतीच्या पावसाचा देखील कापूस पिकाला मोठा फटका बसला असून वावरातच कापसाच्या वाती तयार झाल्या होत्या.
अशा परिस्थितीत यावर्षी कापसाच्या उत्पादनात घट झाली आहे शिवाय परतीच्या पावसामुळे कापसाची उत्पादकता देखील खालावली आहे. यामुळे सध्या बाजारात आवक होत असलेला कापसाचा दर्जा चांगला नसल्याचे कारण पुढे कापसाचे बाजार भाव पाडले जात आहेत. असा आरोप कापूस उत्पादक शेतकरी करत आहेत. दरम्यान जाणकार लोकांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात कापडाला मागणी नसल्याने भारतातून कमी प्रमाणात कापडाची निर्यात होत आहे.
परिणामी देशांतर्गत कार्यरत असलेल्या कापड उद्योगाकडून कापसाची कमी मागणी होत आहे. यामुळे देशांतर्गत कापूस बाजार भाव दबावात आहेत. शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कापसाला कमी दर मिळत असल्याने आपल्या देशात कापसाचे दर कमी झाले असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान सध्या बाजारपेठेत कापसाला नऊ हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी बाजार भाव मिळत असल्याने शेतकरी बांधवांची डोकेदुखी वाढली आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की आज सावनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1700 क्विंटल एवढी कापसाची आवक झाली. आज झालेल्या लिलावात कापसाला सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव या एपीएमसी मध्ये मिळाला असून 7821 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव देखील 7821 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे. निश्चितच कापसाला सध्या आठ हजार रुपये प्रतिक्विंटल पेक्षा देखील कमी बाजार भाव मिळत असल्याचे चित्र आहे.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील इतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला यापेक्षा अधिक बाजार भाव मिळत आहे. मात्र असे असले तरी सध्याचा बाजारभाव हा 9000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमीच आहे. दरम्यान कापूस उत्पादक शेतकरी बांधवांच्या मते कापसाला 12 हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला तरच कापूस पीक शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरते.
निश्चितच शेतकरी बांधवांच्या अपेक्षाप्रमाणे सध्या कापसाला बाजार भाव मिळत नसून सध्या मिळत असलेल्या बाजारभावात शेतकरी बांधवांसाठी उत्पादन खर्च काढणे मुश्किल असल्याचे चित्र आहे. जाणकार लोकांच्या मते भविष्यात उद्योगाकडून कापसाची मागणी वाढल्यास तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे बाजार भाव वाढल्यास कापूस बाजार भाव देशांतर्गत वाढू शकतात. काही तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांनी कापसाला 9000 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव गृहीत धरून कापसाची विक्री करणे त्यांच्यासाठी फायद्याचे राहणार आहे.