Kapus Bajarbhav : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणार एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाचे राज्यातील खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ जवळपास सर्वत्र लागवड केली जाते.
अहमदनगर जिल्ह्यातही कापूस लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. शिवाय गेल्यावर्षी कापसाला चांगला विक्रमी बाजार भाव मिळाला असल्याने यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील कापूस लागवडीखालील क्षेत्र किंचित वाढले आहे.
मात्र यावर्षी सुरुवातीपासूनच कापूस बाजार भाव दबावत आहेत. दरम्यान गेल्या पाच ते सहा दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सरकीच्या दरात वाढ झाली असल्याने व सरकीची मागणी वाढली असल्याने कापसाला मागणी आणि बाजार भाव वाढला होता. मात्र आता पुन्हा एकदा कापसाच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कापसाच्या बाजारभावात तब्बल 600 रुपयांची घसरण नमूद करण्यात आली आहे.
यामुळे कापूस उत्पादक शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग स्पष्ट दिसत आहेत. सध्या अहमदनगर जिल्ह्यात 8700 प्रतिक्विंटल पर्यंतचा बाजार भाव कापसाला मिळत नाही. मित्रांनो खरं पाहता गेल्या हंगामात कापसाला तब्बल 12 हजार रुपये प्रतिक्विंटल ते 13 हजार रुपये प्रतिक्विंटल चा बाजार भाव मिळत होता. गेल्या हंगामात अहमदनगर जिल्ह्यातही कापसाला चांगलीच तेजी होती.
आशा परिस्थितीत या हंगामात देखील कापसाला चांगला बाजार भाव मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा होती. शिवाय यावर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच परतीच्या पावसामुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले असून कापसाच्या उत्पादनात तब्बल 70 टक्के एवढी घट नमूद केली जाणार असल्याने कापसाला चांगला विक्रमी बाजार भाव मिळेल अन कापसाच्या उत्पादनात झालेली घट दरवाढीने भरून निघेल असे शेतकऱ्यांना वाटत होते.
मात्र आता कापसाच्या बाजारभावात दोन दिवसांपासून सहाशे रुपयांची घसरण झाली असून सध्या जिल्ह्यात कापसाला 8700 प्रतिक्विंटल पर्यंतचा बाजारभाव मिळत आहे. यामुळे दरवाढीची कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आशा पुन्हा एकदा फोल ठरली आहे. मित्रांनो, यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे कापूस उत्पादनात देखील मोठी घट झाली आहे. शिवाय पावसाचा लहरीपणामुळे कापूस पिकावर वेगवेगळ्या रोगांचे सावट या हंगामात पाहायला मिळाले असल्याने कापूस पीक जोपासण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उत्पादन खर्च केला आहे.
मात्र आता उत्पादनात झालेली घट पाहता आणि सध्या कापसाला मिळत असलेला बाजार भाव पाहता कापूस पीक शेतकऱ्यांसाठी तोट्याचे सिद्ध होणार आहे. कापूस उत्पादक शेतकरी बांधवांच्या मते यावर्षी कापूस पिकासाठी झालेला उत्पादन खर्च काढणे देखील अवघड होणार आहे. निश्चितच कापूस पीक म्हणजे हौसेनें केला पति, त्याला भरली रगतपिती असे बनले असून शेतकऱ्यांना या हंगामात कापूस पिकातून अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळणार असल्याचे चित्र आहे.