Kapus Bajarbhav : कापूस (Cotton Crop) हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणार आहेत एक मुख्य नगदी पीक (Cash Crop) आहे. या पिकाची आपल्या राज्यातील खान्देश, विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. दरम्यान कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेने महाराष्ट्रात कापूस उत्पादन (Cotton production) या वर्षी वाढणार असल्याचा दावा केला आहे.
या संस्थेच्या मते महाराष्ट्रात आणि गुजरात मध्ये कापसाचे उत्पादन यंदा वाढणार आहे. मात्र शेतकरी बांधवांनी या संस्थेचा दावा फेटाळून लावला आहे. शेतकऱ्यांच्या (Farmer) मते या वर्षी कापूस पिकावर हवामान बदलाचा मोठा विपरित परिणाम झाला असून यामुळे कापसाच्या उत्पादनात घट होणार आहे.
गुजरात आणि महाराष्ट्रात उत्पादित होणाऱ्या कापसामुळे यावर्षी देशाचे एकूण कापूस उत्पादन देखील वाढणार असल्याचा दावा या संस्थेने केला असल्याने यावर्षी कापसाचे बाजार भाव (Cotton Rate) दबावात राहणार असल्याचे काही जाणकार नमूद करत आहेत. दरम्यान शेतकरी बांधवांच्या मते या वर्षी पावसाच्या लहरीपणामुळे कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे.
हवामान बदलामुळे कापूस पिकावर वेगवेगळ्या रोगांचे सावट या हंगामात कायम राहिले आहे. याव्यतिरिक्त अतिवृष्टीमुळे कापूस पिकावर बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव या वर्षी अधिक पाहायला मिळाला आहे. एवढेच नाही तर शेवटी शेवटी परतीच्या पावसामुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसामुळे ऐन हार्वेस्टिंग दरम्यान कापूस पिकाला मोठा फटका बसला असून वावरातच कापूस भिजला आहे.
यामुळे कापसाचा दर्जा आणि उत्पादन दोन्ही घटणार असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे शेतकरी बांधवांच्या मते कापसाचे बाजार भाव यावर्षी वाढायला पाहिजेत. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, सध्या कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल ते नऊ हजार 700 रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा बाजार भाव मिळत आहे.
आगामी काळात कापसाला नऊ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत सर्वसाधारण बाजार भाव मिळणार असल्याचे काही जाणकारांनी नमूद केले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी बाजारपेठेचा अंदाज बांधत कापसाची टप्प्याटप्प्याने विक्री करत राहणे त्यांच्यासाठी निश्चितच फायद्याचे ठरणार आहे.