Kapus Bajarbhav : गेल्या दोन आठवड्यांपासून कापूस दरात चांगलीच तेजी आली आहे. राज्यात कापसाने 9000 रुपये प्रति क्विंटलचा सरासरीचा टप्पा गाठला आहे. तसेच कमाल बाजारभाव देखील आता साडेनऊ हजार रुपये प्रति क्विंटलवर येऊन ठेपला आहे.
खरं पाहता बाजार समितीनुसार बाजारभावात बदल पाहायला मिळत आहे. मात्र कापसाला आता 9000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक कमाल दर सर्वत्र मिळत असल्याचे चित्र आहे. खानदेश मधील यावलमध्ये मात्र कापसाचे बाजार भाव अजूनही दबावात असून यावल एपीएमसीमध्ये 19 नोव्हेंबर रोजी झालेल्या लिलावात कापसाला 7940 रुपये प्रति क्विंटलचा सरासरी दर मिळाला होता. विशेष म्हणजे कमाल बाजार भाव देखील आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढाच राहिला होता.
राज्यातील इतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मात्र कापसाने 9000 रुपये प्रति क्विंटलचा सरासरी बाजारभाव गाठला आहे. निश्चितच गेल्या काही दिवसांच्या तुलनेत कापसाला आता विक्रमी दर मिळू लागला आहे. दरम्यान कापसाला चांगला समाधानकारक बाजार भाव आता मिळत असल्याचे चित्र असले तरी देखील शेतकरी बांधवांना कापसाच्या बाजारभावात वाढ होण्याची आशा आहे.
खरं पाहता गेल्यावर्षी सुरवातीला बहुतांशी शेतकरी बांधवांनी आठ हजार रुपये प्रति क्विंटलवर आपला कापूस विक्री केला होता. मात्र, त्यानंतर कापसाच्या दरात गेल्यावर्षी मोठी वाढ झाली आणि कापसाला तब्बल 14 हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा दर मिळाला, हंगाम सरताना देखील कापसाला 12 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव गेल्या वर्षी नमूद करण्यात आला होता. यावर्षी देखील अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते असे शेतकऱ्यांना वाटतं आहे, यामुळे शेतकरी बांधव सध्या कापसाची विक्री करणे ऐवजी कापसाची साठवणूक करण्यावर अधिक भर देत आहेत.
हेच कारण आहे की मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या पाच दिवसांपासून सुरू झालेल्या लिलावात मात्र दोन हजार क्विंटल एवढीच कापसाची आवक झाली आहे. मित्रांनो मानवत एपीएमसी कापसाचे लिलावासाठी विशेष ओळखली जाते. या एपीएमसीमध्ये कापसाची विक्रमी खरेदी केली जाते.
पाथरी, परभणी, सोनपेठ, जिंतूर या तालुक्यांसह मंठा, परतूर, माजलगाव इत्यादी परिसरातील कापूस उत्पादक शेतकरी या एपीएमसी मध्ये कापूस विक्रीसाठी दाखल होत असतात. खरं पाहता बाजार समितीत जाहीर लिलाव पद्धतीने लिलाव केले जातात तसेच रोख रक्कम शेतकऱ्यांना उपलब्ध होते यामुळे शेतकऱ्यांचा कापूस विक्रीसाठी या एपीएमसीकडे मोठा ओघ असतो.
या एपीएमसी मध्ये दरवर्षी चार ते पाच लाख क्विंटल कापसाचे खरेदी होते. दरम्यान, 19 नोव्हेंबर रोजी झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला 9365 रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे. म्हणजेच मानवत एपीएमसीने देखील 9000 रुपये प्रति क्विंटल सरासरी बाजारभावाचा टप्पा गाठला आहे.
मात्र शेतकऱ्यांना भाव वाढ होण्याची आशा आहे. यामुळे सध्या एपीएमसीमध्ये आवक मंदावली आहे. व्यापाऱ्यांच्या मते, तूर्तास शेतकरी बांधव दरवाढीची आशा ठेवून आहेत. यामुळे शेतकरी बांधव कापूस विक्री करणे ऐवजी साठवणुकीवर भर देत आहेत. यामुळे आगामी काळात कापसाला काय दर मिळतो यावर कापसाची किती आवक होते हे ठरणार आहे.