Kapus Bajarbhav : कापूस हे खरीप हंगामात उत्पादित केले जाणार एक मुख्य नगदी पिक आहे. या पिकाची आपल्या महाराष्ट्रात देखील लागवड विशेष उल्लेखनीय आहे. मात्र असे असले तरी कापूस पिकासाठी होणारा उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय कापूस पिकातून मिळणारे उत्पादन हवामान बदलामुळे कमी झाले आहे. दरम्यान सध्या मिळत असलेल्या हमीभावात कापसासाठी झालेला उत्पादन खर्च काढणे अशक्य आहे.
यामुळे गेल्या काही वर्षात कापूस लागवड तुलनेने कमी झाली आहे. अशा परिस्थितीत कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी कापसाला मिळत असणाऱ्या हमीभावात वाढ केली जावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. कापसाला आता बारा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव दिला जावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
कापसाला किमान 12 हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा बाजार भाव मिळावा या अनुषंगाने तेलंगाना मधील शेतकरी बांधव मागणी करत असून यासाठी निदर्शने देखील केली जात आहेत. खरं पाहता गेल्यावर्षी कापसाला समाधानकारक बाजार भाव मिळाला असल्याने या वर्षी कापूस लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र असे असले तरी कापसासाठी लागणारा उत्पादन खर्च वाढला आहे. कापूस पिकासाठी आवश्यक बी बियाणे, खत खाद्य, तसेच कीटकनाशकांचा खर्च अव्वाच्या सव्वा झाला आहे.
यामुळे सध्या मिळत असलेल्या बाजारभावात तसेच हमीभावात कापसासाठी झालेला खर्च काढणे अशक्य आहे. यामुळे शासनाने 12000 रुपये प्रति क्विंटलचा हमीभाव द्यावा अशी मागणी आता जोर धरत आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की सध्या कापसाला सहा हजार 80 रुपये प्रतिक्विंटल एवढा हमीभाव मिळत आहे. दरम्यान सध्या एक क्विंटल कापूस उत्पादित करण्यासाठी शेतकऱ्यांना आठ हजार रुपयांचा खर्च येतो.
अशा परिस्थितीत सध्या मिळत असलेल्या तुटपुंजी हमीभावात कापूस पिकासाठी झालेला खर्च तरी कसा काढायचा हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. एकंदरीत सध्याची हमीभावाची परिस्थिती पाहता कापूस पीक शेतकऱ्यांसाठी तोट्याचे बनले आहे. शेतकऱ्यांच्या मते यामुळेच कापूस उत्पादित केल्या जाणाऱ्या क्षेत्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत.
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कापूस पिकासाठी मिळणाऱ्या हमीभावात वाढ केले जावे या अनुषंगाने 29 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी तेलंगाना मध्ये शेतकऱ्यांकडून निदर्शने केली जाणार आहेत. दरम्यान आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की सध्या देशांतर्गत कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल पासून ते 9500 प्रतिक्विंटल पर्यंत बाजार भाव मिळत आहे.
अशा परिस्थितीत जाणकार लोकांच्या मते शेतकरी बांधवांनी 9000 रुपये प्रति क्विंटल एवढी दर पातळी लक्षात घेऊन शेतकरी बांधवांनी टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री करत राहणे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे. निश्चितच हमीभावाबाबत केलेली शेतकऱ्यांची ही मागणी केव्हा पूर्ण होईल आणि होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.