Kapus Bajarbhav Maharashtra : आज कापूस उत्पादकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. आज कापसाच्या दरात थोडीशी सुधारणा पाहायला मिळाली. आज सेलू एपीएमसीमध्ये कापसाला ८७४५ रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला. अर्थातच गेल्या महिन्याच्या तुलनेत हा बाजारभाव कमी आहे.
गेल्या महिन्यात कापसाला 9000 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळत होता. मात्र दरात सुधारणा झाली असल्याने भविष्यात अजून भाव वाढ होईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या कापूस लिलावाची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
सावनेर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज दोन हजार क्विंटल कापसाची आवक झाली. आजच्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला 8200 प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 8250 नमूद झाला आहे.
सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती :- या बाजारात आज 606 क्विंटल कापसाचे आवक झाली. आजच्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला 8655 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे तसेच सरासरी बाजार भाव 8745 नमूद झाला आहे.
किनवट कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 82 क्विंटल कापसाचे आवक झाली. आजच्या लिलावात या एपीएमसीमध्ये कापसाला 8000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 8100 रुपये प्रति क्विंटल नमूद झाला आहे.
उमरेड कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 92 क्विंटल लोकल कापसाची आवक झाली. आजच्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला आठ हजार 350 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि सरासरी दर आठ हजार चारशे रुपये नमूद झाला आहे.
काटोल कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 116 क्विंटल लोकल कापसाची आवक झाली. आजच्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला 8000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8350 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव आठ हजार दोनशे नमूद झाला आहे.
सिंदी सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती :- या बाजारात आज 163 क्विंटल लाँग स्टेपल कापसाचीं आवक झाली. आजच्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला साडेआठ हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8660 रुपये प्रति क्विंटल कमाल आणि सरासरी दर 8600 नमूद झाला आहे.