Kapus Bajarbhav : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात कापसाचे बाजार भाव वाढत आहेत. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळत आहे. यावर्षी एक ऑक्टोंबर रोजी सुरू झालेला कापूस हंगाम सुरुवातीला दणक्यात सुरू झाला.
मुहूर्ताच्या कापसाला तब्बल 16000 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव खानदेशात नमूद करण्यात आला, तर मराठवाड्यात अकरा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव कापसाला मिळाला. त्यामुळे गेल्या वर्षी प्रमाणे द्या वर्षे देखील कापसाला चांगला विक्रमी बाजार भाव मिळणार असल्याचे शेतकऱ्यांना वाटत होते.
मात्र, मुहूर्ताचा काही कालावधी वगळता व्यापाऱ्यांनी कापसाचे बाजारभाव म्हणून पाडले. कापसामध्ये अधिक आद्रता असल्याचे कारण पुढे करत बाजार भाव कमी करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झाला होता. मात्र आता मागील काही दिवसांपासून कापूस दरात वाढ होत आहे. जाणकार लोकांच्या मते देशांतर्गत कापसाची आवक मोठी कमी झाली आहे.
एकीकडे बाजारात कापसाची आवक कमी झाली तर दुसरीकडे उद्योगाकडून कापसाला मोठी मागणी आली आहे. याशिवाय तेलबिया पेंड महागले असल्याने बाजारात सरकी पेंडला मागणी आली आहे. सरकी पेंडला मागणी आली नसतात सरकीची मागणी वाढली परिणामी कापसाची देखील मागणी आणि बाजार भाव वाढले. काल अर्थातच शुक्रवारी झालेल्या लिलावात कापसाच्या दरात क्विंटल मागे शंभर रुपये एवढी वाढ नमूद करण्यात आली. मात्र सरासरी बाजारभावाचा विचार केला तर काल सरासरी बाजार भाव स्थिर होते.
राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल किमान दर 8000 रुपये प्रति क्विंटल तर कमाल दर 9000 रुपये प्रति क्विंटल एवढे पाहायला मिळाले. दरम्यान काल सरकीच्या बाजारभावात देखील वाढ झाली. काल सरकीच्या दरात पन्नास रुपयांची वाढ झाली. आता सरकीला किमान दर 3700 प्रतिक्विंटल ते कमाल दर चार हजार रुपये प्रति क्विंटल मिळत आहे.
महाराष्ट्रात काल 8000 रुपये प्रति क्विंटल ते 9000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत कापूस बाजार भाव नमूद करण्यात आले. गुजरात पंजाब हरियाणा तेलंगाना राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यात कापसाला 8000 रुपये प्रतिक्विंटल ते 9000 300 रुपये प्रति क्विंटल पर्यंत बाजारभाव मिळाला. सध्या बाजारात कापसाचे दर वाढत आहेत मात्र कापसाची आवक वाढत नसल्याचे चित्र आहे.
शेतकरी बांधवांना कापसाचा अधिक बाजार भाव मिळण्याची आशा असल्याने त्यांनी साठवणूक करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान जाणकार लोकांच्या मते पुढील काही दिवस कापसाला 9000 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा आढावा घेत कापसाचे विक्री करत राहणे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे.