Kapus Bajarbhav : महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात घसरण होऊन देखील देशांतर्गत कापूस बाजार भाव तेजीत पाहायला मिळाले आहेत. विशेष म्हणजे खेडा खरेदीमध्ये कापसाने दहा हजाराचा टप्पा गाठला आहे.
महाराष्ट्रात खेडा खरेदीमध्ये कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव आता मिळू लागला आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. मात्र असे असले तरी कापूस उत्पादक शेतकरी बांधव या दरात कापूस विक्रीसाठी राजी नसल्याचे चित्र आहे.
एका मीडिया रिपोर्ट मध्ये केलेल्या दाव्यानुसार आज महाराष्ट्रात खेडा खरेदीमध्ये कापसाला 9,900 रुपये प्रति क्विंटलचा कमाल बाजार भाव मिळाला आहे. विशेष म्हणजे राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील कापूस दरात वाढ झाली असून शंभर ते दोनशे रुपयांची वाढ नमूद करण्यात आले आहे. एकीकडे कापूस बाजार भावात वाढ होत आहे तर दुसरीकडे कापसाचे आवक दिवसेंदिवस कमी होत आहे.
शेतकरी बांधव सध्या मिळत असलेल्या बाजारभावात कापूस विक्रीसाठी तयार नसल्याचे जाणकारांनी नमूद केले आहे. शेतकरी बांधवांना कापसाच्या दरात अजूनच वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान बाजारात कापसाचे आवक कमी होत असल्याने कापूस दरात वाढ होत आहे. आज राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावानुसार कापसाला सात हजार 950 रुपये प्रतिक्विंटल ते 9050 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी बाजार भाव मिळाला आहे.
बाजार समितीमध्ये देखील कापसाला 9325 रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा कमाल बाजार भाव आज नमूद करण्यात आला आहे. दरम्यान खेडा खरेदीमध्ये कापूस दर 9900 प्रतिक्विंटल पर्यंत पोहोचले आहेत. कापसाची आवक तुलनेने कमी असल्याने दरात वाढ होत असल्याचे जाणकार नमूद करत आहेत. शेतकरी बांधवांना दरवाढीची आशा असल्याने त्यांनी कापूस साठवून ठेवला आहे.
हेच कारण आहे की आज आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस बाजार भाव दबावात असून विशेष म्हणजे भारतीय वायदे बाजारात देखील कापूस दर दबावत असताना कापसाला विक्रमी बाजार भाव मिळाल्याची नोंद झाली आहे. दरम्यान सध्या कमाल बाजारभावात मोठी वाढ झाली असून कमाल बाजारभाव 9900 प्रतिक्विंटल पर्यंत येऊन ठेपला आहे. मात्र असे असले तरी सरासरी बाजार भाव अजूनही 9000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा खालीच आहेत.
मात्र शेतकरी बांधवांसाठी एक दिलासादायक बातमी अशी की जाणकार लोकांनी कापसाला नऊ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी बाजार भाव मिळण्याची आशा व्यक्त केली आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी देखील 9000 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी बाजार भाव मिळणार हे लक्षात ठेवून कापसाची टप्प्याटप्प्याने विक्री करत राहणे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे.