Kapus Bajarbhav : कापूस हे खरीप हंगामातील एक मुख्य पीक आहे. या पिकाची आपल्या महाराष्ट्रात समवेत संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. गेल्या वर्षी कापसाला चांगला ऐतिहासिक बाजार भाव (Cotton Rate) मिळाला असल्याने या वर्षी कापूस लागवडीखालीलक्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील खानदेश प्रांतात कापूस लागवड विशेष उल्लेखनीय आहे. यावर्षी खानदेशात देखील कापसाची लागवड वाढली आहे. गेल्या वर्षी कापसाला चांगला बाजारभाव मिळाला असल्याने यावर्षी कापसाला तसाच बाजार भाव मिळेल अशी शेतकऱ्यांची इच्छा होती.
मात्र मुहूर्ताचा काही कालावधी वगळता यावर्षी संपूर्ण हंगाम भर कापूस बाजार भाव दबावत राहिले आहेत. मुहूर्ता मध्ये मराठवाड्यातील औरंगाबाद विभागातील सिल्लोड तालुक्यात तसेच खानदेशातील जळगाव जिल्ह्यात कापसाला चांगला ऐतिहासिक बाजार भाव मिळाला होता. जळगाव मध्ये कापसाला सोळा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळत होता तर इकडे मराठवाड्यातील औरंगाबाद विभागात देखील कापसाला चांगला ऐतिहासिक बाजार भाव मिळाला.
औरंगाबाद मधील सिल्लोड मध्ये कापसाला 11000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मुहूर्ताला नमूद करण्यात आला आहे. मात्र तदनंतर कापसाच्या बाजारभावात चांगलीच घसरण मिळाली आहे. शेतकरी बांधवांच्या मते कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी कापसामध्ये आद्रता असल्याचे कारण पुढे करत कापसाचे बाजार भाव हाणून पाडले आहेत. दरम्यान जाणकार लोकांनी नमूद केलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कापसाचे बाजार भाव दबावत आहेत.
अशा परिस्थितीत याचे पडसाद देशांतर्गत बाजारपेठेत उमटत आहेत. देशांतर्गत बाजारपेठेत देखील कापसाचे बाजार भाव दबावात आहेत. सध्या देशांतर्गत कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल ते 9 हजार 500 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळत आहे. मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात महागाईचा भडका उडालेला आहे. जागतिक बाजारपेठेत महागाई वाढली असल्याने कापड उद्योग मंदीमध्ये आहे.
युरोप सह इतर महत्त्वाच्या जागतिक बाजारपेठेत कापडाला मागणी कमी झाली आहे. मित्रांनो भारतातून युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात कापडाची निर्यात केली जाते. मात्र महागाई वाढली असल्याने कापड मागणीमध्ये मोठी घट झाली आहे. यामुळे कापसाला कापड उद्योगाकडून देशात मागणी नसल्याचे चित्र आहे. खरं पाहता यावर्षी प्रमुख कापूस उत्पादक राष्ट्र अमेरिका चीन आणि पाकिस्तान या तीनही देशात हवामान बदलामुळे कापसाच्या उत्पादनात घट होणार होती.
परिणामी भारतीय कापसाला सुगीचे दिवस येणार असल्याचे ठरलेलं होतं. मात्र कापड बाजारात कमालीची मंदी असल्याने यावर्षी भारतीय कापसाला अपेक्षित अशी मागणी किंवा उठाव नाही. परिणामी यावर्षी कापसाचे बाजार भाव दबावात असल्याचे चित्र आहे. जाणकार लोकांनी वर्तवलेल्या माहितीनुसार आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला उठाव आल्यास कापसाच्या बाजारभावात निश्चितच वाढ होणार आहे. निश्चितच भविष्यात कापसाला काय बाजार भाव मिळतो हे सर्वस्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला उठाव मिळतो की नाही यावर अवलंबून राहणार आहे.