Kapus Bajarbhav : यंदा एक ऑक्टोबर पासून कापसाचा हंगाम सुरू झाला आहे. एक ऑक्टोबर रोजी सुरू झालेल्या कापूस हंगामात सुरुवातीला विशेषता मुहूर्ताच्या कापसाला तब्बल 16 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळाला होता. मात्र मुहूर्ताचा हंगाम वगळता कापूस दर दबावात पाहायला मिळत होते. मात्र आता गेल्या आठवड्यापासून कापूस दरात सुधारणा होत असल्याचे चित्र आहे.
कापसाच्या दरात सात ते आठ दिवसांपासून जवळपास 700 ते 800 रुपयांची सुधारणा पाहायला मिळत आहे. दरम्यान काल झालेल्या लिलावात कापूस बाजारभावात शंभर रुपयांची वाढ पाहायला मिळाली. एकीकडे कापून बाजार भाव वाढत आहे तर दुसरीकडे कापसाची आवकही कमी होत आहे.
जाणकार लोकांच्या मते, शेतकरी बांधवांनी आता दरवाढीच्या आशेने कापूस साठवून ठेवायला सुरुवात केली आहे. देशांतर्गत कापुस बाजार भावाचा विचार केला तर काही राज्यात कापसाचे किमान बाजार भाव वाढले तर काही राज्यात कापसाचे कमाल बाजार भाव वाढलेत. खरं पाहता दिवाळीनंतर शेतकरी बांधवांनी कापसाचे विक्री थांबवली. दिवाळीमध्ये शेतकरी बांधवांना पैशांची निकड असल्याने तसेच रब्बी हंगामात पीक पेरणीसाठी पैसा लागत असल्याने शेतकरी बांधवांनी कापसाची मोठ्या प्रमाणात विक्री केली होती.
मात्र आता शेतकरी बांधवांना तूर्तास पैशांची निकड नसून आता शेतकऱ्यांनी कापूस साठवायला सुरुवात केली आहे. दिवाळी नंतर कापूस उत्पादक शेतकरी कापूस साठवणार असा अंदाज जाणकार लोकांनी याआधीच व्यक्त केला होता. आता जाणकार लोकांनी वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे कापूस उत्पादक शेतकरी बांधव कापसाची साठवणूक करत असून भविष्यात त्यांना कापसाचे बाजार भाव वाढण्याची आशा आहे.
बाजारात आता कापसाची आवक कमी होत असून उद्योगाकडून कापूस खरेदी वाढली आहे. यामुळे कापूस दरात वाढ होत आहे. देशांतर्गत त्या कापसाला आठ हजार ते 9 हजार 300 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजारभाव मिळत आहे. महाराष्ट्रात देखील कापसाला सरासरी 8000 रुपये प्रति क्विंटल ते नऊ हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा दर मिळत आहे.