Kapus Bajarbhav : कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळू लागला आहे. कापसाच्या दरात गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे. आज देखील कापूस बाजारभावात वाढ झाली आहे.
खरं पाहता यावर्षी कापूस हंगाम 1 ऑक्टोबर पासून सुरू झाला. हंगामाच्या सुरुवातीला कापसाला चांगला विक्रमी दर देखील मिळाला. मात्र तदनंतर कापूस बाजार भाव दबावात गेलेत. मात्र आता गेल्या आठवड्यापासून कापूस दरात रोजाना वाढ पाहायला मिळत आहे.
जाणकार लोकांच्या मते तेलबिया पेंड महागले असल्याने बाजारात सरकी पेंड ला मोठी मागणी आली आहे. साहजिकच सरकी पेंडला मागणी आली म्हणजेच कापसाची मागणी वाढते आणि मागणी वाढली म्हणजेच बाजारभावात वाढ होते. यामुळे सध्या कापसाच्या दरात वाढ होत असून आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस मागणी आणि दर वाढत असल्याचा फायदा देखील देशांतर्गत कापूस बाजार भावाला मिळत आहे.
दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला काय बाजार भाव मिळाला आहे याची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया आजचे कापूस बाजार भाव सविस्तर.
सावनेर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 800 क्विंटल कापसाचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कापसाला नऊ हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून कमाल बाजार भाव 9 हजार 100 तर सरासरी बाजार भाव 9 हजार 50 रुपये एवढा नमूद करण्यात आला आहे.
किनवट कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज112 क्विंटल कापसाचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कापसाला 8800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 9 हजार 100 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार मिळाला आहे. तसेच सरासरी 9 हजार रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे
कोपर्णा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज तीनशे क्विंटल लोकल कापसाचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला साडेआठ हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 9121 रुपये प्रतिक्विंटल कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव आठ हजार 900 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती :- वर्धा एपीएमसी मध्ये आज कापसाला सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे. वर्धा एपीएमसीमध्ये आज मध्यम स्टेपल कापसाची 90 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला 9 हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 9325 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 9250 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
यावल कृषी उत्पन्न बाजार समिती :- जळगाव जिल्ह्यातील एक महत्त्वाची कापूस बाजारपेठ अर्थातच यावल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 58 क्विंटल एवढी मध्यम स्टेपल कापसाची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला सात हजार 180 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 8350 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 7950 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
चिमूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- चिमूर एपीएमसी मध्ये आज सहा क्विंटल मध्यम स्टेपल कापसाचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला नऊ हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 9 हजार 51 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 9,025 रुपये नमूद करण्यात आला आहे.