Kapus Bajarbhav : यावर्षी महाराष्ट्रात एक ऑक्टोबर रोजी कापसाचा हंगाम सुरू झाला. हंगाम सुरू झाला तो मोठ्या दणक्यात. हंगामाच्या सुरुवातीला मुहूर्ताच्या कापसाला राज्यातील विविध ठिकाणी 11000 रुपये प्रति क्विंटल ते 16 हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा कमाल बाजार भाव नमूद करण्यात आला.
यामुळे कापूस उत्पादक शेतकरी बांधवांच्या अशा मोठ्या पल्लवीत झाल्या होत्या. हंगामाच्या सुरुवातीला चांगला विक्रमी बाजार भाव मिळाला असल्याने यावर्षी देखील गेल्यावर्षीप्रमाणेच कापसाला उच्चांकी बाजार भाव मिळेल अशी शेतकऱ्यांची आशा होती.
मात्र मुहूर्ताचा काही कालावधी वगळता कापसाच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. आता मात्र कापसाच्या बाजारभावात थोडी सुधारणा पाहायला मिळत आहे. जाणकार लोकांच्या मते बाजारात तेलबिया पेंड महाग झाले असल्याने सरकी पेंडला मोठी मागणी झाली आहे. सरकी पेंडला मागणी असल्यामुळे सरकीच्या मागणीत वाढ झाली असून परिणामी कापसाची मागणी वाढली आहे. यामुळे कापसाच्या मागणीतही वाढ झाली आहे आणि बाजार भाव देखील चांगलेच तेजीत आले आहेत.
खरं पाहता राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण कापूस या नगदी पिकावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत कापूस दरात वाढ झाली असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पाहायला मिळत आहे. नागपूर जिल्ह्यातही कापूस लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. दरम्यान आता नागपूर जिल्ह्यातील कुहू उपबाजारात कापसाची खरेदी सुरू झाले आहे.
दहा नोव्हेंबर रोजी या उपबाजारात कापसाची खरेदी सुरू झाली. हाती आलेल्या माहितीनुसार खरेदीच्या पहिल्या दिवशी या उपबाजारात कापसाची दीडशे क्विंटल आवक झाली.
या दिवशी झालेल्या लिलावात कापसाला 9 हजार 201 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव नमूद करण्यात आला. दरम्यान खरेदीच्या पहिल्याच दिवशी कापसाला समाधानकारक दर मिळाला असल्याने शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंदचे भाव यावेळी स्पष्टपणे पहायला मिळत होते.
बाजार समितीमध्ये कापसाला चांगला दर मिळत असल्याने येत्या काही दिवसात कापसाचे आवक वाढण्याची शक्यता बाजार समिती प्रशासनाने वर्तवली आहे. बाजार समिती प्रशासनाकडून शेतकरी बांधवांना बाजार समितीच्या आवारातच कापसाची विक्री करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.