Kapus Bajarbhav : कापूस हे खरीप हंगामात उत्पादित केले जाणार एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची भारतातील बहुतांशी राज्यात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
यामध्ये गुजरात हरियाणा राजस्थान इत्यादी राज्यांचा समावेश होतो. महाराष्ट्रात कापूस लागवडीखालील क्षेत्र देखील विशेष उल्लेखनीय आहे. भारताच्या एकूण कापूस उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले जाते.
राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण हे कापूस या नगदी पिकावर अवलंबून आहे. सध्या राज्यात कापूस खरेदीचा हंगाम सुरू आहे. खरं पाहता कापूस खरेदीचा हंगाम एक ऑक्टोबर रोजीच सुरू झाला होता. मात्र आता टप्प्याटप्प्याने राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापूस खरेदीला सुरुवात केली जात आहे.
परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा मिळणार आहे. परभणी एपीएमसीमध्ये 21 नोव्हेंबर रोजी कापूस खरेदीला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. काल झालेल्या कापूस खरेदीच्या लिलावात या एपीएमसी मध्ये मुहूर्ताच्या कापसाला नऊ हजार 100 रुपये प्रति क्विंटलचा कमाल दर मिळाला आहे. किमान दर 8930 तसेच सरासरी बाजार भाव 8970 रुपये नमूद करण्यात आला.
निश्चितच या एपीएमसी मध्ये 9 हजार रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास सरासरी दर कापसाला मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. दरम्यान शेतकरी बांधवांना कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी कापसाला बारा हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा दर मिळाला असल्याने यावर्षी देखील कापसाला 12000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर मिळणार असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
दरवाढीची आशा असल्याने शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे. निश्चितच कापसाला काय दर मिळतो हे तर येणारा काळच सांगेल मात्र परभणी एपीएमसी मध्ये कापूस खरेदी सुरू झाली असल्याने शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळणार आहे.