Kapus Bajarbhav : यावर्षी कापसाचा हंगाम एक ऑक्टोबर रोजी सुरू झाला. सुरुवातीला कापसाला अतिशय कवडीमोल दर मिळत होता. गेल्या वर्षी कापसाला 12,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर संपूर्ण हंगाम भर मिळाला असल्याने यावर्षी कापसाला अधिक बाजार भाव मिळेल अशी शेतकऱ्यांची आशा होती.
मात्र सुरुवातीच्या टप्प्यात कापसाला कवडीमोल दर मिळाला. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी बांधव चिंतेत सापडला होता. दरम्यान आता कापसाच्या दरात वाढ होत आहे.
सुरुवातीला 7000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतच्या निचांकी बाजारभावावर कापसाचे सौदे होत होते. मात्र आता यामध्ये वाढ झाली असून कापसाने दहा हजार रुपये प्रति क्विंटलचा पल्ला गाठला आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव असून बाजारभावात अजूनच वाढ होणार अशा आशा पल्लवीत झाल्या आहेत.
खरं पाहता दिवाळीच्या काळात कापसाला कमी दर मिळत होता मात्र सणासाठी पैशांची निकड असल्याने शेतकऱ्यांनी कापूस विक्री केला. सणाव्यतिरिक्त रब्बी हंगामासाठी देखील शेतकऱ्यांना पैशांची उभारणी करायची होती यामुळे शेतकरी बांधवांनी कमी दर असूनही कापसाची विक्री करण्यास प्राधान्य दिले.
मात्र दिवाळीनंतर शेतकरी बांधवांनी कापसाची विक्री कमी दरात करायची नाही असे ठरवले यामुळे त्यांनी कापसाची साठवणूक करण्यास सुरुवात केली. शेतकऱ्यांच्या या निर्णयामुळे बाजारात कापसाची आवक मंदावली परिणामी आता दरात वाढ होत आहे. कापसाला आता दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळू लागला आहे. मात्र बहुतांशी शेतकरी बांधव 12,000 रुपये प्रति क्विंटल एवढा कापसाला दर मिळेल या आशेवर असून दरवाढीची प्रतीक्षा करत आहेत.
दरम्यान, कापूस नगरी खानदेशमधून कापूस दराबाबत सकारात्मक बातमी समोर येत आहे. खानदेश मधील नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या पळाशी येथील कापूस खरेदी केंद्रात कापसाच्या दरात वाढ झाली आहे. या बाजारात सुरुवातीला कापसाला साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी दर मिळत होता.
मात्र मध्यंतरी यामध्ये वाढ झाली आणि कापसाने नऊ हजार रुपये प्रतिक्विंटलचा पल्ला गाठला. मात्र आता यामध्ये अजूनच वाढ झाली असून कापसाने दहा हजार रुपये प्रतिक्विंटलचा पल्ला गाठला असल्याचे एका मीडिया रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. या बाजारात कापूस खरेदीला सुरुवात होऊन जवळपास एक महिना उलटला आहे. आतापर्यंत या बाजारात 12 ते 13 हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे.
निश्चितच या एपीएमसी मध्ये कापूस दरात वाढ झाली आहे मात्र शेतकऱ्यांना कापसाच्या भावात अजूनच वाढ होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे. कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना 12 ते 13 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत कापसाला दर मिळावेत अशी आशा आहे. निश्चितच आगामी काळात कापसाला काय दर मिळतो यावर बाजार समितीमधील कापसाची आवक राहणार आहे.