Kapus Bajarbhav : यावर्षी कापसाचा हंगाम सुरू झाला आणि कापसाला उच्चांकी बाजार भाव मिळाला. हंगामाच्या सुरुवातीला खानदेश मध्ये कापसाला सोळा हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा बाजारभाव देऊन नाहक गाजावाजा व्यापाऱ्यांकडून केला गेला आणि यामुळे कापूस वेचणीचे भाव वाढले. इकडे मराठवाड्यात देखील काहीशी असेच परिस्थिती पाहायला मिळाली. मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्याच्या सेलू तालुक्यात माहूर्ताच्या कापसाला तब्बल आकरा हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव मिळाला.
कापसाला एवढा विक्रमी बाजार भाव मिळाला असल्याने कापूस वेचणीचे दर देखील वाढले. मात्र मुहूर्ताचा काही कालावधी वगळता कापसाचे बाजार भाव व्यापाऱ्यांकडून हाणून पाडण्यात आले. मित्रांनो खरं पाहता प्रत्येक शेतमालाच्या उडताच्या खरेदीला व्यापाऱ्यांकडून अव्वाच्या सव्वा बाजारभाव दिले जातात आणि मग हंगाम पुढे गेला की लगेच शेतमालाचे भाव हाणून पाडले जातात. यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होते. कापसाच्या बाबतीत देखील यंदा तसंच काहीसं घडलं आहे. मित्रांनो हंगामाच्या सुरुवातीला व्यापाऱ्यांनी कापसाला चांगला विक्रमी बाजार भाव दिला परिणामी मजुरांनी देखील मजुरी वाढवली.
आता कापसाचा हंगाम सुरू होऊन जवळपास दिड महिना उलटण्याच्या मार्गावर आहे. मात्र सुरवातीचा काही कालावधी वगळता अजूनही कापूस बाजार भाव दबावात आहेत. दरम्यान आता पाच ते सहा दिवसांपासून कापसाच्या दरात रोजाना वाढ होत असून गेल्या पाच दिवसात 500 ते 600 रुपयांची कापूस दरात वाढ झाली आहे. यामुळे याचा देखील सर्वत्र मोठा गाजावाजा केला जात आहे. कापसाचे बाजार भाव वाढले, कापसाचे बाजार भाव वाढले असं रोजच कानावर पडत आहे. मात्र कापसाचे बाजार भाव जरी वाढले असले तरी देखील यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे उत्पादनात भली मोठी घट होणार आहे याकडे देखील लक्ष घालने जरुरीचे आहे. शिवाय हवामानाच्या बदलामुळे कर यांना कापूस उत्पादित करण्यासाठी अधिक खर्च करावा लागला आहे. अधिक खर्च करून देखील उत्पादनात घटच झाली आहे.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी 25 ते 40% कापसाच्या उत्पादनात घट होणार आहे. मराठवाड्यासारखीच परिस्थिती खानदेशात पण पाहायला मिळत आहे. खानदेशातील कापूस पिकाला परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला होता. अशा परिस्थितीत दर वाढलेले असले तरी देखील उत्पादन फारच कमी झाले आहे यामुळे वाढीव दराचा शेतकऱ्यांना फायदा होणारच असे नाही. मित्रांनो तसेच उत्पादनात घट झाली आणि वेचणीचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच ते सात रुपयांनी वाढले. कापूस वेचणी करण्यासाठी शेतकऱ्यांना किलोमागे 12 ते 15 रुपये खर्च करावे लागत आहेत.
निश्चितच कापसाला मिळत असलेल्या बाजारभावाची चर्चा करण्याअगोदर कापूस उत्पादित करण्यासाठी होणाऱ्या खर्चाची देखील चर्चा झाली पाहिजे. एकंदरीत कापसाला मिळत असलेला सध्याचा बाजार भाव विक्रमी असला तरीदेखील कापूस पीक उत्पादित करण्यासाठी कापसाला झालेला खर्च देखील विक्रमीच आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या देशांतर्गत कापसाला साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी बाजार भाव मिळत आहे.
तसेच जाणकारांनी आगामी काळात 9 हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी बाजारभाव कापसाला मिळणार असल्याचे सांगितले आहे. जर सरासरी बाजार भाव 9 हजार रुपये प्रति क्विंटल एवढा गेला तर निश्चितच कापसाचे कमाल बाजार भाव दहा हजाराचा टप्पा ओलांडणार आहेत आणि तेव्हा देखील असाच गाजावाजा होणार आहे. मात्र या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना कितपत होणार ही निश्चितच एक विश्लेषणात्मक बाब राहणार आहे.