Kapus Bajarbhav : कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो खरं पाहता कापूस हे खरीप हंगामात उत्पादित केले जाणारे एक मुख्य नगदी पीक आहे. कापूस पिकाची आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधव कापूस या नगदी पिकावर अवलंबून असतात. आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे.
कापसाच्या बाजारभावात पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळत आहे. मित्रांनो खरं पाहता कापसाला गेल्या वर्षी चांगला विक्रमी बाजार भाव मिळाला होता. एवढेच नाही तर यावर्षी मुहूर्ताच्या कापसाला देखील चांगला विक्रमी बाजारभाव मिळाला होता. मात्र तदनंतर कापसाच्या बाजारभावात मोठी घसरण झाली.
सध्या कापूस बाजार भाव कमालीचे दबावात आहेत. सध्या देशांतर्गत कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल ते नऊ हजार 500 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजारभाव मिळत आहे. दरम्यान आता राज्यात अनेक ठिकाणी खाजगी खरेदी सुरू झाली आहे. मित्रांनो अकोला जिल्हा हा कापसाच्या उत्पादनासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो. या जिल्ह्यात अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती ही कापसाच्या लिलावासाठी संपूर्ण भारत वर्षात प्रख्यात आहे.
अकोट व आजूबाजूच्या परिसराला कॉटन बेल्ट म्हणून देखील ओळखले जाते. या परिसरासाठी अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती मोठे महत्त्वाचे ठरते. दरम्यान अकोट मध्ये खाजगी कापूस खरेदी सुरू झाली आहे. एका मीडिया रिपोर्ट नुसार अकोट मध्ये सुरू झालेल्या खाजगी कापूस खरेदी मध्ये कापसाला नऊ हजार 111 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. निश्चितच कापसाला मिळालेला हा बाजार भाव गेल्या काही दिवसांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी बांधवांच्या अशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता कापसाच्या बाजारभावात वाढ होण्याची आशा आहे. मात्र आज राज्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावात कापसाला नऊ हजाराच्या आत कापसाला दर मिळाले आहेत.
दरम्यान जाणकार लोकांच्या मते, सुत आणि कापडाला अपेक्षित असा उठाव नसल्याने कापसाच्या बाजारभावात घसरण झाली आहे. मात्र कापसाला फेब्रुवारी पर्यंत सरासरी 9 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत बाजारभाव मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सावध पवित्रा ठेऊन कापसाची टप्प्याटप्प्याने विक्री करत राहणे त्यांच्यासाठी फायद्याचे राहणार आहे.