Kapus Bajarbhav : कापूस हे खरीप हंगामातील एक महत्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची संपूर्ण भारत वर्षात शेती केली जाते. महाराष्ट्रात देखील कापसाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. दरम्यान, गेल्या वर्षी कापसाला चांगला विक्रमी बाजारभाव मिळाला असल्याने यावर्षी कापूस लागवडीखालील क्षेत्रात विशेष वाढ झाली आहे. मात्र यावर्षी मुहूर्ताचा काही कालावधी वगळता कापसाचे बाजार भाव दबावत राहिले आहेत.
मुहूर्ताच्या कापसाला यावर्षी अकरा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव नमूद करण्यात आला होता. मात्र तदनंतर कापसाच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे. सध्या कापसाचे बाजारभाव 7 हजार रुपये प्रति क्विंटल ते 8 हजार 700 रुपये प्रति क्विंटल पर्यंत आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलबिया पेंडचा तसेच देशांतर्गत सोयाबीन पेंडचा बाजार भाव वाढत असल्याने सरकी पेंडच्या बाजारभावात देखील वाढ होत आहे. सप्टेंबर मध्ये सरकी पेंडला कवडीमोल बाजारभाव मिळत होता.
मात्र नोव्हेंबर महिन्यात सरकी पेंडच्या बाजारभावात चांगली वाढ झाली आहे. सध्या सरकी पेंडला 2639 चा भाव मिळत आहे. सरकी पेंडच्या दरात सुधारणा होत आहे म्हणजेच सरकीचे देखील दर वाढत आहेत. सध्या सरकीला 3700 ते 4200 पर्यंतचा बाजारभाव मिळत आहे. सोयाबीन तसेच इतर तेलबिया पेंड चढ्या दराने विक्री होत असल्याने सरकी पेंडची मागणी वाढली आहे. परिणामी सरकीची देखील मागणी मोठी वाढली आहे.
सरकीची मागणी वाढली असल्याने कापूस बाजारभावात वाढ झाली असून कापसाची देखील मागणी वाढत आहे. कापसाच्या दरात सरकीच्या दरात वाढ झाली असल्याने वाढ होत आहे. दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या काही काळात सरकीची मागणी आणि बाजारभाव वाढणार आहेत. आशा परिस्थितीत याचा परिणाम कापूस बाजारात पाहिला मिळणार आहे. यामुळे कापसाच्या दरात वाढ होणार आहे. दरम्यान शेतकरी बांधवांनी नऊ हजार रुपये प्रति क्विंटल एवढी दर पातळी लक्षात ठेऊन कापसाची विक्री करत राहणे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे.