Kapus Bajarbhav : कापूस (Cotton Crop) हे महाराष्ट्रात उत्पादित केल जाणार एक मुख्य नगदी पीक (Cash Crop) आहे. या पिकाची (Cotton Farming) लागवड खानदेश विदर्भ मराठवाडा समवेतच पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केली जाते.
राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांची (Farmer) अर्थकारण कापूस या नगदी पिकावर अवलंबून असते. आपल्या खानदेश प्रांताला तर कॉटन बेल्ट म्हणून ओळखले जाते. गेल्या वर्षी कापसाला उच्चांकी बाजार भाव (Cotton Rate) मिळाला असल्याने यावर्षी कापसाच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे.
गत वर्षी कापसाला तेरा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा बाजार भाव नमूद करण्यात आला होता. शिवाय या वर्षी देखील मुहूर्ताच्या कापसाला चांगला बाजार भाव मिळाला होता. खानदेश मधील जळगाव मध्ये मुहूर्ताच्या कापसाला सोळा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा बाजार भाव मिळाला असल्याची माहिती समोर आली होती.
एवढेच नाही तर मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातही मुहूर्ताच्या कापसाला तब्बल अकरा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा बाजार भाव नमूद करण्यात आला होता. मात्र तदनंतर कापसाचे बाजार भाव दबावात असल्याचे चित्र आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी कमी असल्याने तसेच देशांतर्गत सूतगिरण्या पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या नसल्याने कापसाला अजून अपेक्षित अशी मागणी पाहायला मिळत नाही.
यामुळे कापसाच्या बाजारभावात अजूनही वाढ होत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे नवीन कापसाची आवक बाजारात कमी होत असल्याचे चित्र आहे. मात्र असे असले तरी जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, आता दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधव कापसाची विक्री करू शकतात.
तसेच येत्या काही दिवसात रब्बी हंगामाला देखील सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत हंगामासाठी शेतकऱ्यांना भांडवल आवश्यक आहे, यामुळे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात कापसाची विक्री करू शकतो. मात्र शेतकरी बांधवांची पैशांची निकड पूर्ण झाल्यानंतर शेतकरी बांधव कापूस विक्री दरवाढीपर्यंत रोखू शकतात असा देखील अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
सध्या कापसाला दर्जानुसार सात हजार रुपये प्रतिक्विंटल ते नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत जा बाजार भाव मिळत आहे. मात्र असे असले तरी गेल्या हंगामात कापसाला कधी नव्हे तो ऐतिहासिक उच्चांकी दर प्राप्त झाला असल्याने या हंगामात कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना अधिक दराची आशा आहे.
दरम्यान कापसाला सरासरी नऊ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा बाजार भाव कायम राहणार असल्याची माहिती तज्ञांनी दिली आहे. अशा परिस्थितीत कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी नऊ हजार रुपये बाजार भाव लक्षात घेऊन कापसाची विक्री करणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.