Kapus Bajarbhav : कापूस (Cotton Crop) हे महाराष्ट्रात उत्पादित केल जाणार एक मुख्य पीक आहे. या पिकाची महाराष्ट्रातील खानदेश, विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लागवड पाहायला मिळते. खानदेशला कॉटन बेल्ट म्हणून ओळखलं जातं. जळगाव जिल्हा हा कापसाच्या उत्पादनासाठी (Cotton Production) संपूर्ण भारतात ओळखला जाणारा जिल्हा आहे.
खरं पाहता या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात कापसाची लागवड वाढली असल्याचा तज्ञांचा अंदाज आहे. गेल्या वर्षी कापसाला विक्रमी बाजार भाव (Cotton Rate) मिळाला असल्याने यावर्षी कापसाची लागवड वाढणार असल्याची सर्वांनाच आशा होती. झालं देखील तसेच यावर्षी कापसाची लागवड वाढली आहे. मात्र ऐन काढणीच्या वेळी कोसळत असलेला पाऊस कापूस पिकासाठी घातक ठरत असून यामुळे कापसाच्या उत्पादनात घट होणार असल्याचे सांगितले जात आहे.
सध्या राज्यात कोसळत असलेला परतीचा पाऊस कापसाचा दर्जा खराब करत आहे. यामुळे कापसामध्ये आद्रता देखील मोठी वाढत आहे. परिणामी अशा कापसाला बाजारात अतिशय नगण्य भाव (Cotton Price) मिळत असल्याचे चित्र आहे. आद्रता अधिक असलेल्या कापसाला सहा हजार रुपये प्रतिक्विंटल पासून बाजार भाव (Cotton Market Price) सुरू होत आहे. दुसरीकडे चांगल्या दर्जाच्या कापसाला साडेआठ हजार रुपये प्रतिक्विंटल पासून बाजार भाव मिळत आहे.
कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी या दरम्यान एक दिलासादायक बातमी देखील समोर येत आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की उत्तर भारतात कापसाचे दर थोडेसे वधारले आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतात कापसाला नऊ हजार 800 रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा बाजार भाव मिळत आहे. यामुळे निश्चितच कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार देशात अजूनही सूत गिरण्या पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नाहीत. यामुळे कापसाला मागणी थोडीशी कमी आहे. सूत गिरण्या जेव्हा पूर्ण क्षमतेने सुरू होतील तेव्हा सुतगिरण्याकडून कापसाची मागणी मोठी वाढेल. अर्थातच कापसाची मागणी कमी असल्याने कापसाचे दर सध्या दबावात आहेत.
मात्र पुढच्या महिन्यापासून परिस्थिती बदलणार असून सुतगिरण्याकडून कापसाची मागणी वाढण्याची शक्यता आहे तसेच उद्योगाकडून देखील कापसाची मागणी वाढणार आहे. अशा परिस्थितीत पुढील महिन्यापासून कापसाला सर्वसाधारण नऊ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा बाजारभाव मिळण्याची शक्यता जाणकार लोकांकडून वर्तवली जात आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी बाजाराचा आढावा घेत कापसाची विक्री करणे त्यांच्यासाठी फायद्याचे राहणार आहे.