Kapus Bajarbhav : गेल्या वर्षी कापसाला ऐतिहासिक बाजार भाव (cotton rate) मिळाला असल्याने या वर्षी कापूस लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. यावर्षी कापसाला चांगला बाजारभाव (cotton market price) मिळेल अशी शेतकऱ्यांची आशा होती मात्र यावर्षी शेतकऱ्यांची (farmer) ही आशा मावळताना पाहायला मिळत आहे. यावर्षी दिवाळीच्या सणाला देखील कापसाला (cotton crop) नगण्य बाजार भाव मिळत आहे. जिनिंग आणि प्रेसिंगमध्ये कापसाची मागणी कमी असल्याने कापसाला खूपच कमी बाजार भाव मिळत आहे.
मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार युरोप आणि अमेरिकेत जागतिक मंदीचे सावट पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत सदर देशात कापसाची मागणी कमी आहे. मित्रांनो आपल्या भारतातून चीनला देखील मोठ्या प्रमाणात कापूस निर्यात (cotton export) केला जातो मात्र चीनमध्ये देखील आर्थिक मंदीचे सावट पाहायला मिळत असल्याने चीनमध्ये भारतीय कापसाची मागणी कमी झाली आहे. यामुळे आपल्या देशातून कापसाची निर्यात खूपच कमी प्रमाणात झाली आहे. साहजिक कापसाला उठाव नसल्याने कापसाचे बाजार भाव पडलेले आहेत.
सध्या देशांतर्गत कापसाला सात हजार रुपये प्रतिक्विंटल ते साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत चा बाजार भाव मिळत आहे. जाणकार लोकांच्या मते मार्चपर्यंत कापसाला बाजार भाव मिळणार नाही. मार्च मध्ये कापसाला 9 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत चा बाजार भाव मिळणार आहे. दरम्यान कापसाला कमी बाजार भाव मिळत असल्याने शेतकरी बांधवांनी कापसाची साठवणूक करण्यास सुरुवात केली असून दिवाळी सणासाठी गरजेपुरता कापूस विकला जात आहे. दरम्यान केंद्र सरकारकडून देखील कापसाची खरेदी सुरू झालेली नाही.
त्यामुळे कापसाचे बाजार भाव पडलेले आहेत. गेल्यावर्षी कापसाला मोठी मागणी होती आणि कापसाचे उत्पादन देखील कमी होते अशा परिस्थितीत गेल्या वर्षी कापसाला बारा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत चा बाजार भाव मिळाला होता. त्यामुळे यावर्षी कापसाचा पेरा 10 टक्क्यानी वाढला आहे. काही जाणकार लोकांच्या मते मार्चपर्यंत कापसाला असाच बाजार भाव मिळणार आहे. शिवाय मार्चनंतर कापसाला काय बाजार भाव मिळतो हे सर्वस्वी जागतिक बाजारपेठेवर अवलंबून राहणार आहे. एकंदरीत यंदाची दिवाळी ही कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी निराशाजनक ठरली आहे.