Kapus Bajarbhav : राज्यात कापूस लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. गेल्या वर्षी कापसाला उच्च आणखी बाजार भाव मिळाला असल्याने यावर्षी राज्यात कापूस लागवडी खालील क्षेत्रात विशेष वाढ झाली आहे. शेतकरी बांधवांनी कापसाला गेल्यावर्षीप्रमाणेच बाजार भाव मिळेल या आशेने कापूस लागवड केली आहे. मात्र, यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासूनच कापूस बाजार भाव दबावात आहेत.
खरं पाहता यावर्षी विजयादशमीच्या दिवशी कापूस हंगामाला सुरुवात झाली आहे. विजयादशमीच्या दिवशी सुरू झालेला कापूस हंगाम तसं पाहता दणक्यात सुरू झाला होता. कारण की मुहूर्ताच्या कापसाला तब्बल 16 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळत होता. मात्र मुहूर्ताचा काही कालावधी वगळता राज्यात कापसाच्या बाजारभावात कमालीची घसरण झाली आहे.
यामुळे कापूस उत्पादक शेतकरी बांधवांची आर्थिक कोंडी होत आहे. कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच कापूस पिकाच्या अंतिम टप्प्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे. परिणामी कापसाच्या उत्पादनात आणि उत्पादकतेत मोठी घट झाली आहे.
यावर्षी पावसामुळे कापसाचा दर्जा खालावला आहे. परिणामी बाजारात कापसाला नगण्य बाजार भाव मिळत असल्याचे चित्र आहे. सध्या कापसाला सहा हजार रुपये प्रति क्विंटल ते सात हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतच बाजार भाव मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. यामुळे सध्या मिळत असलेल्या बाजारभावात कापूस पिकासाठी झालेला खर्च देखील काढणे अशक्य असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
मित्रांनो आणि आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की 28 ऑक्टोबर 2022 रोजी सावनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावात कापसाला सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला होता. तसेच त्याच दिवशी वडवणी येथे 6800 प्रतिक्विंटल एवढा कापसाला बाजार भाव मिळाला. याशिवाय वरोरा माढेली या ठिकाणी 7521 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला.
तसेच त्या दिवशी सर्वात जास्त पुलगाव या ठिकाणी मध्यम स्टेपलच्या कापसाला आठ हजार एकशे अकरा रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव मिळाला आहे. म्हणजेच सध्या कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल ते 8 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळत असल्याचे चित्र आहे. जाणकार लोकांनी देखील शेतकरी बांधवांना नऊ हजार रुपये प्रति क्विंटल एवढी दर पातळी निश्चित समजून कापसाची टप्प्याटप्प्याने विक्री करत राहणे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे. निश्चितच यावर्षी गेल्यावर्षी प्रमाणे कापसाला बाजार भाव मिळत नसल्याने शेतकरी बांधवांचा भ्रमनिरास झाला आहे.