Kapus Bajarbhav : गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधवांना सातत्याने निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान सहन करावे लागत आहे. कधी अवकाळी पाऊस, कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ तर कधी परतीचा पाऊस त्यामुळे बळीराजा अक्षरशा मेटाकुटीला आला आहे. एकीकडे निसर्गाचे दुष्टचक्र शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे तर दुसरीकडे सुलतानी दडपशाही देखील शेतकऱ्यांना जगू देत नसल्याचे चित्र आहे.
निसर्गाच्या लहरीपणापासून कसेबसे शेतकरी बांधव शेतमाल उत्पादित करतात मात्र बाजारपेठेत कष्टाने उत्पादित केलेल्या शेतमालाला अतिशय कवडीमोल दर मिळतो. त्यामुळे बळीराजा पुरता संकटात सापडला असल्याचे चित्र आहे. यावर्षी देखील खरीप हंगाम पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या हातून पूर्ण वाया गेला आहे.
खरीप हंगामात सुरुवातीला अतिवृष्टीमुळे तसेच पिक काढण्याच्या वेळी आलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान या संकटातून बळीराजाने कसेबसे आपले पिक आवरले आणि थोडेफार उत्पादन पदरात पाडले आहे. आता मात्र बळीराजाने तारेवरची कसरत करून वाचवलेल्या शेतमालाला अतिशय कवडीमोल दर मिळत असल्याचे चित्र आहे.
कापूस या खरीप हंगामातील मुख्य पिकाला देखील गेल्या दोन आठवड्यांपूर्वी अतिशय नगण्य बाजारभाव मिळत होता. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून परिस्थिती बदलत असल्याचे चित्र आहे. कापसाच्या दरात वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस गाठीला चांगला दर मिळत असल्याने देशांतर्गत कापसाच्या बाजारभावात वाढ झाली आहे. जाणकार लोकांच्या मते बाजारात तेलबिया पेंड महागले असल्याने सरकी पेंडला कधी नव्हे ती ऐतिहासिक मागणी आली आहे.
याचा देखील कापसाच्या दरात वाढ होण्यामागे मुख्य रोल आहे. सध्या कापसाला खेडा खरेदीमध्ये तब्बल नऊ हजार नऊशे रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा कमाल दर मिळू लागला आहे. बाजार समितीमध्ये देखील कापसाला 9300 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा कमाल बाजार भाव नमूद केला जात आहे. यामुळे येत्या काही दिवसात कापसाला 12 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळणार असल्याचे जाणकार नमूद करत आहेत.
यामुळे कापूस शेतकरी बांधवांना श्रीमंत बनवणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. शेतकरी बांधवांच्या मते कापसाला जरी ऐतिहासिक बाजार भाव मिळाला तरी देखील पुष्पक शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरणार नाही. शेतकऱ्यांच्या मते, यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. दहा ते बारा क्विंटल प्रति एकरी उत्पादन मिळत असलेल्या कापसातून यावर्षी निम्मे उत्पादन मिळणार आहे.
म्हणजेच कापसाचे निम्म्याने घट झाली आहे. त्यामुळे वाढीव दरातून केव्हा नुकसान भरून निघणार आहे मात्र याचा फायदा होणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. निश्चितच वाढीव दराचा शेतकऱ्यांना फायदा झाला नाही तरीदेखील झालेले नुकसान भरून निघेल आणि पदरी थोडेफार पैसे शिल्लक राहतील एवढे नक्की. यामुळे शेतकरी बांधवांना आपला संसाराचा गाडा स्वाभिमानाने चालवता येणे शक्य होणार आहे.