Kapus Bajarbhav : महाराष्ट्रात कापसाची शेती (Cotton Farming) विशेष उल्लेखनीय आहे. महाराष्ट्रातील खान्देश प्रांत (Khandesh) कापसाच्या उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. खानदेशातील तिन्ही जिल्ह्यात कापसाची लागवड (Cotton Cultivation) भल्या मोठ्या प्रमाणावर केली जाते. गेल्या वर्षी कापसाला कधी नव्हे तो उच्चांकी बाजार भाव (Cotton Rate) मिळाला असल्याने यावर्षी कापसाचा पेरा देखील वाढला आहे.
तसेच यावर्षीच्या हंगामाच्या सुरुवातीला कॉटन बेल्ट म्हणून ओळखल्या जाणार्या जळगाव जिल्ह्यातून कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी (Cotton Grower Farmer) एक मोठी आनंदाची बातमी देखील समोर आली होती. जळगाव जिल्ह्यात मुहूर्ताच्या कापसाला तब्बल सोळा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा बाजार भाव नमूद करण्यात आला होता.
याशिवाय मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड मध्ये देखील यावर्षी मुहूर्ताच्या कापसाला तब्बल अकरा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव नमूद करण्यात आला होता. मात्र मुहूर्तनंतर कापसाच्या बाजार भावात उतरती कळा पाहायला मिळाली. सध्या बाजारात कापसाचे भाव चांगलेच दबावात आले आहेत. महाराष्ट्रात सध्या कापसाला सात हजार रुपये प्रतिक्विंटल ते साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा बाजार भाव नमूद केला जात आहे.
शेतकऱ्यांच्या मते, या बाजारभावात कापसाची विक्री केल्यास त्यांना उत्पादनखर्च काढणे देखील मुश्कील होणार आहे. मात्र, आता कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. दिवाळीपर्यंत कापसाच्या बाजारभावात वाढ होण्याची शक्यता जाणकार लोकांकडून वर्तवण्यात आली आहे. सध्या कापसाचा भाव साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत नमूद केला जात आहे. मात्र भविष्यात कापसाचे दर बाजारात होणाऱ्या आवकेवर आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असलेल्या मागणीवर अवलंबून राहणार असल्याचे तज्ञ नमूद करत आहेत.
जळगाव जिल्ह्यातील जिनिंग प्रेसिंग असोसिएशनने या वर्षी उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. असोसिएशनने या वर्षी 25 ते 30 लाख गाठींचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. परतीच्या पावसामुळे कापसाचे नुकसान होत असले तरी देखील पेरा अधिक असल्याने कापसाचे उत्पादन विक्रमी राहणार आहे. यामुळे या वर्षी उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र असे असले तरी परतीच्या पावसामुळे कापसाच्या आद्रतेमध्ये वाढ झाली आहे.
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 112 टक्के पाऊस झाला आहे. पाऊस चांगला झाला असल्याने उत्पादनात वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे मात्र परतीच्या पावसामुळे कापसाचा दर्जा खराब देखील होतोय. खरं पाहता गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे कापसाचे मोठे नुकसान झाले होते तसेच गेल्या वर्षी कापसाचा पेरा देखील घटलेला होता यामुळे उत्पादन कमी होते. अशा परिस्थितीत जिनिंग-प्रेसिंग उद्योगाला लवकरच बंद करावे लागले होते याचा उद्योगाला मोठा धक्का बसला होता. दरम्यान यावर्षी उत्पादन अधिक राहणार असल्याने उद्योगाला फायदा होणार आहे.
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना देखील दरवाढीचा फायदा मिळू शकतो. मात्र सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी खूपच नगण्य आहे. मात्र असे असले तरी सध्या साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत चा बाजार भाव मिळत आहे. मात्र जर अंतरराष्ट्रीय बाजारात आवक वाढली आणि मागणी कमी झाली तर याचा फटका देशांतर्गत बाजारात देखील बसू शकतो आणि कापसाचे भाव सात हजाराच्या देखील खाली जाऊ शकतात.
शिवाय कापसाचा दर्जा देखील परतीच्या पावसामुळे खराब झाला आहे. त्यामुळे देखील कापसाच्या भावात घट होण्याची शक्यता आहे. एकंदरीत कापसाला काय बाजार भाव मिळतो हे आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून राहणार आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढली आणि मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाला तर देशांतर्गत कापसाचे भाव वधारू शकतात.
त्यामुळे भविष्यात कापसाचे दर वाढतात की अजूनच कमी होतात हे सर्वस्वी आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून राहणार आहे. तोपर्यंत शेतकरी बांधवांना सुरक्षित रित्या आपला खेळ खेळायचा आहे. बाजारपेठेचा अंदाज बांधत चांगला दर मिळाला तर टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री करत राहणे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे.