Kapus Bajarbhav : कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. कापसाच्या दरात मोठी वाढ होत आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून कापूस दरात रोजाना वाढ नमूद केले जात आहे. काल झालेल्या लिलावात देखील कापसाला चांगला विक्रमी दर मिळाला आहे.
काल मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला तब्बल 9550 रुपये प्रति क्विंटलचा कमाल दर मिळाला आहे. विशेष म्हणजे आता राज्यात कापसाला 9050 रुपये प्रति क्विंटल ते नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी दर मिळू लागला आहे.
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की कापुस बाजारातील तज्ञ लोकांनी गेल्या महिन्यात कापसाला नऊ हजार रुपये प्रति क्विंटलचा सरासरी दर मिळणार असल्याची भविष्यवाणी केली होती. आता कापूस तज्ञांचे हे म्हणणे खरे ठरत असून कापसाला नऊ हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक सरासरी दर मिळू लागला आहे.
दरम्यान आता कापसाने जवळपास दहा हजाराचा पल्ला गाठला असल्याने भविष्यात कापसाच्या दरात अजूनच वाढ होण्याची आशा शेतकऱ्यांच्या मनात बळावू लागली आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी वाढली असल्याने तसेच तेलबिया बेंड महागले यामुळे सरकी पेंडची मागणी वाढली असल्याने देशाअंतर्गत कापूस दरात सुधारणा होत असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.
कापसाच्या दरात वाढ होत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पाहायला मिळत आहेत. आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला मिळत असलेल्या बाजारभावाविषयी चर्चा करणार आहोत.
सावनेर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये काल एक हजार क्विंटल कापसाची आवक झाली. या एपीएमसीमध्ये काल झालेल्या लिलावात कापसाला 9000 रुपये प्रति क्विंटल किमान बाजार भाव मिळाला असून 9100 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी दर 9050 रुपये नमूद करण्यात आला आहे.
किनवट कृषी उत्पन्न बाजार समिती :- किनवट एपीएमसीमध्ये काल 134 क्विंटल कापसाची आवक झाली. काल झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला 8 हजार 900 रुपये प्रति क्विंटल किमान बाजार भाव मिळाला असून 9 हजार 200रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 9000 रुपये नमूद करण्यात आला आहे.
राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये काल 580 क्विंटल कापसाची आवक झाली. काल झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कापसाला 8750 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 9,100 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 9 हजार रुपये नमूद करण्यात आला आहे.
मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती :- मानवत एपीएमसीमध्ये काल पाचशे क्विंटल कापसाची आवक झाली. या एपीएमसी मध्ये काल कापसाला 9,100 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 9,550 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 9400 नमूद करण्यात आला आहे.