Kapus Bajarbhav : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरं पाहता एक ऑक्टोबर रोजी कापूस हंगाम सुरू झाला. हंगाम सुरू झाला त्यावेळी कापसाला तब्बल 16 हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मिळाला.
यामुळे कापूस उत्पादक शेतकरी बांधवांच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र तदनंतर कापसाच्या दरात घसरण झाली. कापूस सात हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली आला. कापूस उत्पादक शेतकरी बांधवांच्या चिंतेत मोठी भर पडली होती. दरम्यान आता कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना गेल्या काही दिवसांपासून दिलासा मिळत आहे.
कापसाचे बाजार भाव जे की दबावात होते आता पुन्हा एकदा तेजीत येत असल्याचे चित्र आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. सध्या कापसाला 9500 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा कमाल बाजारभाव मिळू लागला आहे. तसेच सरासरी बाजार भाव साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल ते 9050 रुपये प्रति क्विंटल नमूद केला जात आहे.
विशेष म्हणजे किमान बाजार भाव देखील 8000 रुपये प्रति क्विंटल ते 9000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत मिळत आहे. एकंदरीत गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कापसाच्या बाजारभावात वाढ पाहायला मिळत आहे. ऑक्टोबर महिन्यात कापसाचे बाजार भाव खाली आले होते. मात्र आता नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कापसाच्या बाजारभावात मोठी वाढ नमूद केली जात आहे. दरम्यान जाणकार लोकांनी शेतकरी बांधवांना कापसाला सरासरी 9000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळणार असल्याचे सांगितले आहे.
यामुळे शेतकरी बांधवांनी कापसाची विक्री करताना 9000 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी बाजार भाव ध्यानात ठेवून बाजारपेठेचा आढावा घेत कापसाची विक्री करत राहणे त्यांच्यासाठी फायद्याचे राहणार आहे. जाणकार लोकांच्या मते बाजारात तेलबिया पेंड महागले असल्याने सरकी पेंड ची मागणी वाढली आहे.
त्यामुळे कापसाची मागणी वाढली असून कापसाला चांगला दर मिळू लागला आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी वाढत असल्याचे काही जाणकारांनी नमूद केले आहे. तसेच आता देशातील सूतगिरण्या देखील पूर्ण क्षमतेने सुरू होत आहेत.
याशिवाय कापड उद्योग पुन्हा एकदा मंदीच्या सावट मधून बाहेर येऊ पाहत आहे. निश्चितच या सर्व कारणांमुळे कापसाच्या दरात हळूहळू का होईना वाढ पाहायला मिळत आहे. सध्या तेजीत असलेले बाजार भाव चिरकाल टीकतील अशी आशा शेतकऱ्यांना देखील आहे.