Kapus Bajarbhav : आज कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. खरं पाहता गेल्या काही दिवसांपासून कापूस दरात घसरण होत होती.
मात्र आज झालेल्या लिलावात कापसाच्या बाजारभावात शंभर ते दोनशे रुपयांपर्यंतची वाढ नमूद केली जात आहे. निश्चितच गेल्या अनेक दिवसांपासून दरवाढीच्या आशेने बसलेल्या शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. खरं पाहता आज राज्यातील सर्वच एपीएमसी मध्ये कापसाला 9000 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे.
त्यामुळे जाणकार लोकांचा 9 हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी बाजार भाव मिळेल हा अंदाज खरा ठरला आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला असल्याचे चित्र आहे. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या कापूस लिलावाची माहिती जाणून घेणार आहोत.
राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज दोन हजार क्विंटल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कापसाला 8700 प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 9011 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 9000 रुपये नमूद झाला आहे.
मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 1300 क्विंटल लोकल कापसाचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला 8700 प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 9235 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 9151 रुपये नमूद झाला आहे.
देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 400 क्विंटल लोकल कापसाचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कापसाला 8950 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 9140 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 9000 रुपये नमूद झाला आहे.