Kapus Bajarbhav : मित्रांनो महाराष्ट्रात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. राज्यातील खानदेश प्रांत कापूस लागवडीसाठी विशेष ओळखला जातो. या व्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्रात, विदर्भ आणि मराठवाड्यात देखील मोठ्या प्रमाणात कापसाची शेती केली जाते. अहमदनगर जिल्ह्यातील कापूस लागवडहीं विशेष उल्लेखनीय आहे. दरम्यान यावर्षी जास्तीच्या पावसामुळे तसेच परतीच्या पावसामुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे कापसाच्या उत्पादनात घट होणार असल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले आहे. दरम्यान आता कापूस वेचणीसाठी शेतकरी बांधवांची लगबग वाढली आहे. खानदेशात तर आगात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात होते यामुळे सप्टेंबर महिन्यापासून खानदेशात कापसाची वेचणी सुरू झाली आहे.
दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातही आता मोठ्या प्रमाणात कापूस वेचणी केली जात आहे. खरं पाहता यावर्षी मुहूर्ताचा काही कालावधी वगळता कापूस बाजार भाव मोठे दबावातत आहेत. दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून कापसाच्या बाजारभावात सुधारणा होत आहे. खरं पाहता तेलबिया पेंडचे भाव वाढले असल्याने सरकी पेंड ची मागणी वाढली आहे. सरकी पेंड ची मागणी वाढली म्हणून बाजार भावात वाढ झाली.
परिणामी सरकीच्या बाजारभावात आणि मागणीत वाढ झाली. यामुळे कापसाच्या मागणीत आणि कापसाच्या दरात देखील तीन ते चार दिवसांपासून वाढ होत आहे. राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाच्या बाजार भावात 400 ते 500 रुपयांची वाढ झाली आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, यावर्षी अतिवृष्टीमुळे तसेच परतीच्या पावसाने कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत वेचणी केला जाणारा कापूस आता नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात वेचणीसाठी तयार झाला आहे. दरम्यान राज्यात कापूस लागवडीखालील क्षेत्र 45 लाख हेक्टर च्या आसपास आहे. अहमदनगर जिल्ह्यातही कापूस लागवडीचे क्षेत्र विशेष उल्लेखनीय असून जिल्ह्यात एकाच वेळी सर्व शेतकरी बांधवांचा कापूस वेचणीसाठी तयार झाला आहे. त्यामुळे कापूस वेचणी करण्यासाठी मजुरी वाढली आहे.
परिणामी गेल्या चार-पाच दिवसांपासून कापसाच्या बाजार भावात वाढ होत असली तरी देखील दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना होणार नसल्याचे चित्र आहे. मित्रांनो गेल्या हंगामात कापूस वेचणीचा दर दहा रुपये प्रति किलो एवढा होता मात्र यावर्षी कापूस वेचणीचा दर हा जवळपास 13 रुपये प्रति किलो ते पंधरा रुपये प्रति किलो पर्यंत गेला आहे. अशा परिस्थितीत कापूस वेचणी करण्यासाठी शेतकऱ्यांना अधिकचा पैसा खर्च करावा लागत आहे. यामुळे कापसाच्या बाजारभावात जी काही पाचशे रुपयांची वाढ झाली आहे ती पाचशे रुपयांची वाढहीं कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना परवडत नसल्याचे चित्र आहे.