Kapus Bajarbhav : कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. आज झालेल्या लिलावात राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापूस दरातील त्याची कायम राहिली आहे. खरं पाहता कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणारे एक मुख्य नगदी पीक म्हणून ओळखलं जातं. कापसाची शेती राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात केली जाते.
विशेषता खानदेश विदर्भ आणि मराठवाड्यातील बागायती भागात कापसाच क्षेत्र विशेष उल्लेखनीय. म्हणजेच कापसाच्या पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. अशा परिस्थितीत राज्यातील शेतकरी बांधव कायमच कापूस बाजार भावाकडे मोठे बारीक लक्ष ठेवून असतात. आम्ही देखील आपल्या शेतकरी वाचक मित्रांच्या सोयीसाठी रोजच कापूस बाजारभावाची डिटेल माहिती घेऊन हजर होत असतो.
आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेले आजचे कापूस लिलाव थोडक्यात पण सविस्तर आणि डिटेल मध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया 15 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेले कापसाचे लिलाव थोडक्यात.
सावनेर कृषी उत्पन्न बाजार समिती :- सावनेर एपीएमसी मध्ये आज 900 क्विंटल कापसाचे आवक झाली. आज झालेल्या निलावाद या एपीएमसी मध्ये कापसाला ९ हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 9100 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 9050 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
किनवट कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज 124 क्विंटल कापसाचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला 8800 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 9200 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 9 हजार रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
आष्टी वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 220 क्विंटल एकेएच4 लांब स्टेपल कापसाची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कापसाला 9100 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 9200 प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 9150 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
आर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या बाजारामध्ये आज एच4 मध्यम स्टेपल कापसाची १४७ क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला 9200 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 9350 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 9290 रुपये प्रतिकूल नमूद करण्यात आला आहे.
मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती :- मानवत एपीएमसी मध्ये आज 500 क्विंटल लोकल कापसाची आवक झाली आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला 9 हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 9465 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 9,300 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती :- वर्धा एपीएमसी मध्ये आज मध्यम स्टेपल कापसाची दीडशे क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून नऊ हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 9200 प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.