Kapus Bajarbhav : महाराष्ट्रात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात कापसाची शेती (Cotton Farming) केली जाते. कापूस (Cotton Crop) हे महाराष्ट्रासमवेतच भारतात उत्पादित केल जाणार खरीप हंगामातील एक मुख्य पीक आहे. मित्रांनो महाराष्ट्रात कापूस लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील खानदेश मराठवाडा विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाची शेती केली जाते.
एकंदरीत कापूस या नगदी पिकावर राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. मात्र असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून कापसाचे बाजार भाव (Cotton Rate) मोठ्या दबावात आहे. दरम्यान कॉटन बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खानदेश मध्ये कापूस उत्पादक शेतकरी बांधवांची दिवाळी कापूस वेचणीतच जात आहे.
खान्देश मधील जळगाव जिल्ह्यात सध्या शेतकरी बांधव दिवाळीचा सण असून देखील कापूस वेचणी करण्यात व्यस्त आहेत. मित्रांनो सध्या खानदेश मध्ये मजूर टंचाई प्रकर्षाने जाणवत असल्याने शेतकरी बांधव आपल्या परिवारासोबत कापसाची वेचणी करत आहेत. सणासुदीच्या दिवसात शेतकरी बांधवांना (Farmer) बांधावर हजेरी लावत असल्याने शेतकरी बांधवांची दिवाळी या वर्षी कापूस वेचणीतच जाणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान बाजारात कापसाला उठाव नसल्याने आणि कापसाला कमी बाजार भाव मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी बांधवांची (Cotton Grower Farmer) चिंता देखील वाढत आहे.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कापूस उत्पादक शेतकरी बांधव कापसाची विक्री करत आहेत मात्र सध्या कापसाला मिळत असलेल्या दर कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी निराशाजनक सिद्ध होतं आहे. दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत कापूस बाजार महागाईमुळे दबावात आहे. जागतिक बाजारपेठेवर मंदिच सावट असल्याने आणि महागाई दिवसेंदिवस वाढत असल्याने कापडं उद्योग प्रभावित झाला आहे.
यामुळे भारतीय कापडाला निर्यात होण्यासाठी अडचणी येत आहे. भारतीय कापड यामुळे कमी प्रमाणात निर्यात होत आहे. साहजिक यामुळे कापड उद्योगाकडून कापसाचे खरेदी अगदी कासवगतीने सुरू आहे. यामुळे जाणकार लोकांच्या मते कापडाला मागणी वाढल्यानंतर कापसाला देखील उठाव मिळणार आहे. कापसाला उठाव मिळाल्यानंतर कापसाच्या बाजारभावात सुधारणा होणार आहे. नोव्हेंबरच्या शेवटी कापसाला उठाव मिळण्याची शक्यता आहे.
सध्या कापसाला सात हजार रुपये प्रतिक्विंटल ते साडेनऊ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत चा बाजारभाव मिळत आहे. नोव्हेंबर शेवटी कापसाची मागणी वाढणार असल्याने सरासरी बाजार भाव 9 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत राहणार असल्याचे जाणकार लोकांनी नमूद केले आहे.