Kapus Bajarbhav : यावर्षी कापसाचा हंगाम एक ऑक्टोबरला सुरू झाला. हंगाम सुरू झाला तो देखील मोठ्या दणक्यात. व्यापाऱ्यांनी हंगामाच्या सुरुवातीला कापसाला कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव दिला. कापसाला हंगामाच्या सुरुवातीस कापसाची पंढरी खानदेश मध्ये तब्बल 16 हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला असल्याचे अनेक मीडिया रिपोर्ट मध्ये समोर आले.
खान्देश प्रमाणेच हंगामाच्या सुरुवातीस मराठवाड्यात देखील कापसाला विक्रमी दर मिळाला. मराठवाड्यातील औरंगाबाद मध्ये कापसाला 11000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला होता. साहजिकच हंगामाच्या सुरुवातीस 11000 रुपये प्रति क्विंटल ते 16 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळाला. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना या हंगामात कापूस मालामाल बनवेल असे वाटू लागले होते.
मात्र हंगाम जसंजसा पुढे गेला तसतसे कापसाचे बाजार भाव दबावात आले. कापूस तब्बल 7000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली आला. मात्र आता नोव्हेंबर मध्ये पुन्हा एकदा कापूस बाजारातील चित्र बदलू लागले आहे. कापसाच्या दरात वाढ होत असल्याचे समजतं आहे. एकीकडे या पेंड महागले असल्याने कापसाचे सरकी पेंडला मागणी आली आहे तर कापड उद्योगात देखील कापसाची मागणी वाढली आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कापूस मागणी हळूहळू वाढत असल्याचे सांगितले जात आहे.
यामुळे कापसाच्या दरात निश्चितच वाढ होत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच कापूस दरात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर वधारले असल्याने देशांतर्गत कापूस बाजार भावाला आधार मिळाला आहे. ऑक्टोबर मध्ये कापसाला कवडीमोल दर मिळत होता मात्र नोव्हेंबर मध्ये हळूहळू कापूस दरात सुधारणा होत आहे. खरं पाहता कापूस 7000 रुपये प्रति क्विंटलवर आल्यानंतर शेतकऱ्यांनी कापसाची विक्री थांबवली. विक्री थांबवली परिणामी कापसाचा बाजारात शॉर्टेज निर्माण झाला. म्हणजे मागणीप्रमाणे पुरवठा होत नव्हता.
साहजिकच यामुळे कापूस दरात वाढ होत आहे. सात हजार रुपये प्रतिक्विंटल वर विक्री होणारा कापूस आता आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल ते नऊ हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल पर्यंत विक्री होऊ लागला आहे. म्हणजेच कापुस बाजार भाव दहा हजाराच्या घरात गेले आहेत. एकीकडे कापूस दर वाढत असून दुसरीकडे कापड उद्योगात कापसाला उठाव नसल्याचे बोलले जात आहे. यामुळे कापसाच्या बाजारभावात चढ-उतार होत आहे. शिवाय येत्या काही दिवसात कापसाच्या बाजारभावात अजूनच मोठ्या प्रमाणात चढ-उतार होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तवली जात आहे.
मात्र असे असले तरी यंदाच्या हंगामात कापसाला नऊ हजार रुपये प्रत्येक क्विंटलचा सरासरी बाजारभाव मिळणार असल्याचे जाणकारांनी नमूद केले जात आहे. आशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी कापूस विक्री करताना नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी बाजारभाव निश्चित समजून कापसाची विक्री टप्प्याटप्प्याने करत रहावे असे आवाहन यावेळी जाणकारांकडून केले जात आहे.