Kapus Bajarbhav : गेल्या वर्षी कापसाला (Cotton Crop) उच्चांकी बाजारभाव (Cotton Rate) मिळाला असल्याने यावर्षी कापसाच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र यावर्षी मुहूर्ताचे काही दिवस वगळता कापसाला नगण्य बाजार भाव (Cotton Price) मिळत आहे. दरम्यान परतीचा पाऊस कापूस पिकासाठी मोठा घातक ठरत आहे.
सध्या कापूस उत्पादनासाठी (Cotton Production) विशेष ओळखल्या जाणाऱ्या खानदेश प्रांतात परतीचा पाऊस चांगला धुमाकूळ घालत असून कापसाच्या वावरातच वाती तयार झाल्या आहेत. खानदेश मध्ये कापसाची हार्वेस्टिंग (Cotton Harvesting) वेचणी सुरु आहे. मात्र कापसाला खूपच नगण्य बाजार भाव मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी बांधव (Cotton Grower Farmer) आता कापसाची साठवणूक करण्याकडे वळले आहेत.
मात्र असे असले तरी बहुतांशी शेतकरी बांधवांना पुरेशी जागा नसल्याने कापसाची साठवणूक करता येत नाहीये परिणामी अशा शेतकरी बांधवांना मिळेल त्या भावात कापसाची विक्री करावी लागत आहे. तसेच काही शेतकरी बांधवांना दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर हातखर्चाला पैसे म्हणून कापसाची विक्री करणे भाग आहे. तर काही शेतकरी बांधवांनी व्याजाचे पैसे काढून कापसाची लागवड केली आहे अशा शेतकरी बांधवांना कर्जाची परतफेड करण्यासाठी कापसाची विक्री करणे भाग आहे. दरम्यान जाणकार लोकांच्या मते सध्या उद्योगाकडून कापसाची मागणी खूपच नगण्य आहे.
शिवाय जागतिक बाजारात मंदीचे सावट आहे. तसेच देशांतर्गत कार्यरत असलेल्या सूतगिरण्या देखील अजून पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नाहीत यामुळे सध्या कापसाला मागणी कमी आहे. मात्र येत्या काही महिन्यात उद्योगाकडून कापसाची मागणी वाढणार असून देशांतर्गत कार्यरत असलेल्या सूतगिरण्या देखील पूर्वपदावर येणार आहेत.
अशा परिस्थितीत कापसाची मागणी देखील मोठी वाढणार आहे. यामुळे येत्या काही महिन्यात कापसाच्या बाजारभावात वाढ होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तज्ञांच्या मते कापसाला यंदा 9 हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा सर्वसाधारण बाजारभाव मिळू शकतो. मात्र असे असले तरी शेतकरी बांधवांना कापसाच्या बाजारभावात यापेक्षाही अधिक वाढ होण्याची अपेक्षा आहे.
17 ऑक्टोबर रोजी वरोरा माढेली या ठिकाणी झालेल्या कापसाचा लिलावात कापसाला आठ हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. या दरम्यान या ठिकाणी 77 क्विंटल कापसाची आवक झाली होती. तसेच 15 तारखेला आर्वी बाजारात 231 क्विंटल एच-4 मध्यम स्टेपल कापसाची आवक झाली होती. या दिवशी झालेल्या लिलावात एच-चार मध्य स्टेपलं कापसाला आठ हजार 21 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला होता.
तसेच या दिवशी झालेल्या लिलावात किमान बाजार भाव 7850 आणि सर्वसाधारण बाजार भाव सात हजार 950 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला होता. निश्चितच सध्या मिळत असलेला बाजार भाव कापुस उत्पादक शेतकरी बांधवांच्या अपेक्षेप्रमाणे नाही शेतकरी बांधवांना कापसाच्या बाजार भावात अजून वाढ होण्याची आशा आहे. एकंदरीत भविष्यात कापसाच्या बाजारभावात वाढ होण्याची आशा तज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळे भविष्यात कापसाला काय बाजार भाव मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.