Kapus Bajarbhav : कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो खरं पाहता आता कापसाच्या बाजारभावात हळूहळू वाढ होत असल्याचे चित्र आहे. खरं पाहता गेल्या हंगामात कापसाला चांगला ऐतिहासिक बाजारभाव मिळाला होता.
मात्र या हंगामात कापसाचे दर मुहूर्ताचा काही कालावधी वगळता दबावात पाहायला मिळत आहेत. दरम्यान आता बाजारात तेलबिया पेंड महागल असल्याने सरकी पेंडची मागणी वाढली आहे. यामुळे सरकी पेंडच्या दरात देखील मोठी वाढ झाली परिणामी याचा कापसाच्या बाजार भावाला देखील आधार मिळत आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, यामुळे कापसाच्या बाजारभावात मोठी वाढ होत आहे.
दरम्यान आज कापसाच्या दरात थोडीशी वाढ पाहायला मिळाली आहे. महाराष्ट्रात कापूस हळूहळू दहा हजाराच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना आगामी काही दिवसात तिला असा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
मित्रांनो आज आपण महाराष्ट्रात झालेल्या कापूस लिलावाची थोडक्यात पण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया आज राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला नेमका काय बाजार भाव मिळाला अन किती आवक झाली.
10 नोव्हेंबर 2022 रोजीचे कापूस बाजारभाव
सावनेर कृषी उत्पन्न बाजार समिती :- मित्रांनो आज सावनेर एपीएमसीमध्ये 1100 क्विंटल कापसाची आवक झाली होती. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कापसाला ८७०० रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून आठ हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच या एपीएमसी मध्ये कापसाला 8750 रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण बाजारभाव मिळाला आहे.
आष्टी वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज ए.के.एच. ४ –लांब स्टेपल कापसाची 90 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कापसाला 9,167 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान, कमाल आणि सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.