Kapus Bajarbhav : गेल्यावर्षी कापसाला संपूर्ण भारतवर्षात कधी नव्हे तो ऐसा विक्रमी दर मिळाला होता. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी बांधवांचा मोठा फायदा झाला होता. गेल्या हंगामात सरते शेवटी देखील कापसाला बारा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा उच्चंकी बाजार भाव मिळाला होता.
जाणकार लोकांच्या मते गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे कापसाचे मोठे नुकसान झाले होते आणि कापसाच्या उत्पादनात भली मोठी घट झाली होती. केवळ भारतातच नव्हे तर गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कापूस उत्पादनात घट झाली होती आणि मागणीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे मागणीनुसार पुरवठा होत नव्हता आणि गेल्या वर्षी कापसाला कधी नव्हे तो विक्रम दर मिळाला.
गेल्या वर्षी भारतात कापसाचे केवळ 307 लाख गाठींचे उत्पादन झाले होते. यावर्षी मात्र कापूस उत्पादनात भली मोठी वाढ पाहायला मिळत आहे. यावर्षी 344 लाख कापूस गाठींचे उत्पादन होणार आहे. साहजिकच उत्पादनात वाढ झाली आहे. उत्पादनात वाढ झाली आहे मात्र कापसाला मागणी वाढली नसल्याचे चित्र आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार असून कापसाच्या दरात मोठी घसरण होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
खरं पाहता गेल्यावर्षी कापसाला चांगला दर मिळाला, यामुळे यावर्षी कापसाचा पेरा वाढला. यावर्षी कापसाचा पेरा वाढला त्यामुळे अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे कापूस पिकाचे नुकसान होऊन देखील एकूण उत्पादनात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. एकूण उत्पादनात गेल्यावर्षीच्या तुलनात 12% ने वाढ आहे. विशेष म्हणजे अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामध्ये सापडूनही कापूस पिकाची गुणवत्ता यावर्षी इतर वर्षांच्या तुलनेत चांगली असल्याचे जाणकारांनी सांगितले आहे.
ऑक्टोबर महिन्यापासून कापसाचे निर्यात सुरू होते ते जानेवारी महिन्यापर्यंत मोठ्या प्रमाणात सुरू राहते. यावर्षी मात्र भारतीय कापसाचे दर जोमात आहेत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस फुल कोमात आहे. भारतीय कापसाचे दर आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत अधिक आहेत. यामुळे कोणत्याही देशाकडून आयात करण्यासाठी भारतीय कापसाला पसंती मिळणे अशक्य आहे. म्हणजेच भारतातून होणारी कापूस निर्यात पूर्णपणे प्रभावित होत आहे.
15 नोव्हेंबर पर्यंत ७० टक्के कापसाची निर्यात होत असते. यावर्षी मात्र संपूर्ण गणितच बिघडलं आहे. निर्यातीचा हा आकडा गाठण्यास अतिशय तारेवरची कसरत निर्यातदारांना होत आहे. जाणकार लोकांनी जगभरातील कापसापेक्षा भारतीय कापसाला दहा टक्के अधिक दर मिळत असल्याचा दावा केला आहे. अशा परिस्थितीत यामुळे निर्यात प्रभावित झाली असून निर्यात मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
यामुळे याचा सरळ परिणाम बाजारभावावर होणार आहे. भारतातून बांगलादेशला मोठ्या प्रमाणात कापूस निर्यात होत असते. यावर्षी मात्र बांगलादेश कडून कापसाची मागणी होत नसल्याचे चित्र आहे. भारतीय कापसापेक्षा इतर देशांचा कापूस हा स्वस्तात मिळत असल्याने ज्या देशांना कापसाची गरज आहे ते स्वस्तचा कापूस खरेदी करत आहे.
महागातला कापूस खरेदी करण्यास कोणी तयार नाही. यामुळेच गेल्या वर्षी 43 लाख कापूस गाठींची निर्यात झाली होती ती यावर्षी मात्र तीस लाख गाठींपर्यंतच होणार असल्याची भीती आहे. अशा परिस्थितीत कापसाच्या दरात घसरण होण्याची शक्यता जाणकार लोकांकडून वर्तवली जात आहे. निश्चितच कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना असं झालं तर फटका बसू शकतो. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.