Kapus Bajarbhav : महाराष्ट्र हा कापसाच्या उत्पादनासाठी संपूर्ण भारतात एक वेगळी ओळख तयार करून बसला आहे. भारताच्या एकूण कापूस उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे गुजरात नंतर महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे उत्पादन पाहायला मिळते.
खरं पाहता क्षेत्राच्या तुलनेत आपल्या महाराष्ट्रात कापूस उत्पादन कमीच आहे मात्र असे असले तरी राज्यातील एकूण कापूस उत्पादन देशातील एकूण कापूस उत्पादनात मोठा सिंहाचा वाटा उचलत असते.
महाराष्ट्रातील जवळपास सर्वच विभागात कापसाची शेती केली जाते. मात्र विदर्भ आणि मराठवाडा ही दोन विभाग कापसाच्या लागवडीसाठी विशेष ओळखली जातात. या दोन विभागातील जवळपास सर्वच जिल्ह्यात कापसाचे शेती केली जाते. एकंदरीत काय मराठवाडा आणि विदर्भ या विभागातील बहुतांशी शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण कापूस या नगदी पिकावर अवलंबून आहे.
मात्र आता विदर्भ आणि मराठवाड्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. या दोन विभागात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. लाल्या रोगाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे कापसाची केवळ दोन वेचणीमध्ये उलंगवाडी होत असल्याचे चित्र शेत शिवारात पाहायला मिळत आहे.
एका आकडेवारीनुसार महाराष्ट्रात जवळपास 27 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. यापैकी 17 लाख हेक्टर क्षेत्र मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागात आहे. आता या दोन्ही विभागातील जवळपास सात लाख हेक्टर क्षेत्र लाल्या रोगाच्या विळख्यात आले आहे. यामुळे सात लाख हेक्टर नक्षत्रावरील कापूस पीक केवळ दोन वेचनीत उलंगवाडी होत आहे.
कापूस पिकावर आलेल्या लाल्या रोगामुळे कपाशीचे पीक लाल पडत असून उत्पादनात भली मोठी घट झाली आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना मोठा फटका बसला आहे. खरं पाहता गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षी देखील चांगले दर मिळतील या आशेने यावर्षी कापूस लागवडीखालील क्षेत्र वाढले. पण यावर्षी कापसाचा बाजार भाव देखील अपेक्षित असा वाढला नाही आणि कापूस उत्पादनात देखील घट झाली यामुळे कापूस उत्पादक शेतकरी बांधवांची आर्थिक कोंडी होत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान आता गेल्या काही दिवसांपासून कापसाच्या दरात वाढ होत आहे. सात ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत विक्री होणारा कापूस हातात साडेनऊ हजाराच्या घरात पोहोचला आहे. काल झालेल्या लिलावात वर्धा मध्ये कापसाला 9261 रुपयाचा बाजार भाव मिळाला आहे. भविष्यात यामध्ये अजून वाढ होण्याची आशा शेतकऱ्यांना आहे.
दरम्यान जाणकार लोकांनी शेतकरी बांधवांना कापसाला 9 हजार रुपये सरासरी बाजार भाव मिळणार असल्याचे सांगितले आहे. मात्र एकीकडे कापूस बाजार भावात वाढ होत आहे तर दुसरीकडे कापसाचे उत्पादनात भली मोठी घट होणार आहे. यामुळे कापसाच्या दरवाढीचा फायदा कापूस उत्पादकांना किती प्रमाणात होतो ही तर एक विश्लेषणात्मक बाब राहणार आहे.