Kapus Bajarbhav : कापूस हे खरीप हंगामात उत्पादित केल जाणार एक मुख्य नगदी पीक आहे. खरं पाहता गेल्यावर्षी कापसाला चांगला दर मिळाला होता. यामुळे यावर्षी कापसाच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली. मात्र यावर्षी मुहूर्ताचा काही कालावधी वगळता कापसाचे बाजारभाव दबावत होते. मात्र आता आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे बाजार भाव सुधारत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस साडेपाच टक्क्यांनी सुधारला आहे.
गेल्या महिन्याभराचा विचार करता काल कापसाच्या बाजारभावात मोठी सुधारणा झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे बाजार भाव वाढल्याने देशांतर्गत कापूस बाजारात थोडीशी वाढ नमूद करण्यात आली आहे. मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे बाजार भाव सुधारले असल्याने देशांतर्गत कापूस बाजारात 100 ते 200 रुपयांची वाढ नमूद करण्यात आले आहे. निश्चित यामुळे पुन्हा एकदा कापूस दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कापूस उत्पादक शेतकरी बांधवांचा देखील यामुळे आशा पल्लवीत झाल्या आहेत. मित्रांनो काल झालेल्या लिलावा देशांतर्गत कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल ते आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव नमूद करण्यात आला. आपल्या महाराष्ट्रात देखील कापूस दरात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या बाजारभावात वाढ झाली असल्याने महाराष्ट्रात कापूस बाजार दरात किंचित वाढ नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात झालेल्या लिलावात कापसाला सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल ते आठ हजार 500 रुपये प्रतिक्विंटल पर्यंत बाजार भाव मिळाला. दरम्यान कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांचा मते भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी वाढल्यानंतर कापसाच्या बाजारभावात अजूनच वाढ होण्याची शक्यता आहे.
जाणकार लोकांच्या मते फेब्रुवारी महिन्यापर्यंत कापसाला चांगला बाजारभाव मिळू शकतो. फेब्रुवारी महिन्यापर्यंत कापसाला नऊ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळू शकतो. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी आता बाजारपेठेचा आढावा घेत कापसाची टप्प्याटप्प्याने विक्री करत राहणे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे.