Kapus Bajarbhav : गेल्या वर्षी कापसाला चांगला ऐतिहासिक आणि विक्रमी बाजारभाव मिळाला होता. गेल्यावर्षी कापसाच्या उत्पादनात घट झाली होती, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी वाढली होती यामुळे कापसाला कधी नव्हे तो विक्रमी बाजारभाव मिळाला होता. मात्र यावर्षी मुहूर्ताचा काही कालावधी वगळता कापसाचे बाजार भाव दबावत असल्याचे चित्र आहे.
यावर्षी देखील हंगामाच्या सुरुवातीला गेल्या वर्षी प्रमाणेच झलक पाहायला मिळाली होती. विजयादशमीच्या दिवशी हंगामाला सुरुवात झाली असून खानदेशात त्यावेळी कापसाला 15 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळाला असल्याचे मीडिया रिपोर्ट मध्ये नमूद करण्यात आले होते. दरम्यान औरंगाबाद मधील सिल्लोड तालुक्यातही मुहूर्ताच्या कापसाला तब्बल 11 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळाला होता.
दरम्यान तदनंतर कापसाच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. सध्या कापसाला बाजार समितीमध्ये 6000 रुपये प्रति क्विंटल ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळत आहे, तर खाजगी व्यापाऱ्यांकडून देखील याच बाजारभावात कापसाची खरेदी होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान कापूस उत्पादक शेतकरी बांधवांच्या मते सध्या मिळत असलेल्या बाजारभावात कापूस पिकासाठी झालेला खर्च काढणे देखील अशक्य आहे. शिवाय यावर्षी अतिवृष्टीमुळे तसेच कापूस पीक अंतिम टप्प्यात असताना म्हणजेच ऐन वेचणी करताना परतीचा पाऊस बरसला असल्याने कापसाच्या उत्पादनात घट झाली आहे.
त्यामुळे शेतकरी बांधवांना यावर्षी देखील कापसाला चांगला उच्चांकी बाजार भाव मिळणार असल्याची आशा आहे. यामुळे सध्या खानदेशात कापसाची साठवणूक केली जात आहे. निश्चितच गेल्या वर्षी कापसाला चांगला ऐतिहासिक बाजार भाव मिळाला असल्याने यावर्षी देखील कापसाला चांगला विक्रमी बाजार भाव मिळेल अशी शेतकऱ्यांची आशा होती. या अनुषंगाने राज्यात कापूस लागवडीखालील क्षेत्र देखील वाढले आहे. मात्र सध्या कापसाचे बाजार भाव दबावत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी बांधवांची डोकेदुखी वाढली आहे.
दरम्यान जाणकार लोकांच्या मते, राष्ट्रीय बाजारात मंदीचे सावट असल्याने कपडा उद्योग मंदीत सापडला आहे. यामुळे भारतीय कापडाला आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी झाली आहे. यामुळे उद्योगाकडून कापसाची मागणी घटली आहे. आयुष्यात उद्योगांमध्ये तेजी आल्यास कापसाच्या बाजार भावात देखील सुधारणा होण्याची शक्यता आहे. जाणकार लोकांच्या मते फेब्रुवारीपर्यंत कापूस 9 हजार रुपये प्रति क्विंटल एवढ्या सरासरी बाजार भावात विक्री होईल. यामुळे 9000 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी बाजार भाव ध्यानात घेऊन शेतकरी बांधवांनी कापसाची विक्री करावी.
काय आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मत?
राज्यात मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे वाढीच्या अवस्थेत असलेल्या कापूस पिकाला मोठा फटका बसला होता. याशिवाय कापूस वेचणी करण्याच्या टायमिंगला यावर्षी परतीचा पाऊस चांगलाच बरसला असल्याने कापूस पिकाची राख रांगोळी झाली आहे. कापसाच्या लहरीपणामुळे कापूस उत्पादनात घट होणार आहे. यामुळे सध्या मिळत असलेल्या 6 हजार रुपये प्रति क्विंटल ते 8 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतच्या बाजारभावात कापूस विक्री करणे शेतकऱ्यांसाठी परवडत नाही. यामुळे शेतकरी सध्या कापसाची साठवणूक करत असल्याचे चित्र आहे. : किरण जाधव (कापूस उत्पादक शेतकरी)