Kapus Bajar bhav : कापूस (Cotton Crop) हे महाराष्ट्रात उत्पादित केल जाणार खरीप हंगामातील एक मुख्य पीक आहे. गेल्या वर्षी कापसाला उच्चांकी बाजार भाव (Cotton Rate) मिळाला होता. गेल्या वर्षी कापूस 11 ते 12 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत विक्री होत होता.
तसेच यावर्षी मुहूर्ताच्या कापसाला देखील चांगला विक्रमी बाजार भाव (Cotton Market Price) मिळाला आहे. यावर्षी मुहूर्ताच्या कापसाला मराठवाड्यातील औरंगाबाद मध्ये अकरा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला असून खानदेशातील जळगाव जिल्ह्यात 15 ते 16 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत मुहूर्ताच्या कापसाला भाव मिळाला आहे. मात्र तदनंतर व्यापाऱ्यांनी कापसाचे बाजार भाव (Cotton Price) पाडले आहेत.
दरम्यान आता देशभरातील कापूस पिकाला परतीच्या पावसाचा (Rain) फटका बसत आहे. मात्र असे असले तरी कापसाचे बाजार भाव अजूनही दबावातच आहेत. अशा परिस्थितीत कापूस उत्पादक शेतकरी बांधव (Cotton Grower Farmer) संकटात सापडला आहे. कापूस व्यापाऱ्यांच्या मते उद्योगाकडून अजूनही कापसाची मागणी अपेक्षित प्रमाणात होत नसल्याने म्हणजेच कापसाचा उठाव कमी असल्याने कापसाला कमी बाजार भाव मिळत आहे.
जागतिक बाजारपेठेत मंदीचे सावट असल्याने कापसाची मागणी लक्षणीय कमी झाली आहे. अशा परिस्थितीत देशांतर्गत कापसाला कमी बाजार भाव मिळत असल्याचे जाणकार नमूद करत आहेत. मात्र आता कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना सुगीचे दिवस येणार आहेत. कारण ती उद्योगाकडून कापसाची मागणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच जागतिक मंदीचे सावट देखील काही प्रमाणात कमी होणार आहे.
अशा परिस्थितीत उद्योगाकडून कापसाला उठाव मिळाल्यास कापसाच्या बाजार भावात सुधारणा होणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या महाराष्ट्रात कापूस सात हजार रुपये प्रतिक्विंटल ते साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत विक्री होत आहे. तसेच प्रमुख कापूस उत्पादक राज्य पंजाब आणि हरियाणा मध्ये सात हजार 500 रुपये प्रति क्विंटल सहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत कापूस विक्री होत आहे.
पुढील काही दिवस कापसाला असाच बाजार भाव कायम राहणार आहे. मात्र त्यानंतर उद्योगाकडून कापसाची मागणी वाढल्यास बाजारभावात वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगितले गेले आहेत. अशा परिस्थितीत कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना गरजेपुरता आणि टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री करण्याचे आवाहन या वेळी जाणकार लोकांकडून करण्यात आले आहे.