Kapus Bajar Bhav : मित्रांनो गेल्या काही वर्षांपासून शेतकरी बांधवांना (Farmer) शेतीमध्ये (Agriculture) निसर्गाच्या लहरीपणाचा (Climate Change) मोठा फटका बसत आहे. यावर्षी देखील पावसाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी बांधवांना या वर्षी मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
मान्सूनच्या सुरुवातीला पावसाचे आगमन उशिरा झाले असल्याने खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या उशिरा झाल्या तसेच यावर्षी अतिवृष्टीमुळे देखील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस (Cotton Crop) या दोन्ही मुख्य पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. शेतकऱ्यांच्या मते सतत कोसळत असलेल्या पावसामुळे सोयाबीन पीक मातीमोल झाले असून कपाशी पिकाचे जवळपास 70 ते 75 टक्के नुकसान झाले आहे.
उत्पादनात घट तर होतच आहे मात्र मुहूर्ताचा काही काळ सोडून कपाशीला अतिशय नगण्य बाजारभाव (Cotton Rate) मिळत आहे. सध्या कापसाला मिळत असलेल्या बाजारभावात (Cotton Price) कापूस पिकासाठी झालेला खर्च काढणे देखील मुश्किल असल्याचे सांगितले जात आहे. सध्या कापूस पिकाला सहा हजार रुपये ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव (Cotton Market Price) मिळत आहे. मात्र या बाजार भावात शेतकरी बांधवांना कापसासाठी आलेला उत्पादन खर्च काढणे मुश्कील आहे.
मित्रांनो खरं पाहता गेल्या वर्षी कापसाला कधी नव्हे तो ऐतिहासिक बाजारभाव मिळाला होता. कापसाला गेल्या वर्षी दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा बाजार भाव मिळत होता. काही ठिकाणी कापूस 12 ते 13 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत विक्री होत होता. गेल्या वर्षी कापसाला असा उच्चांकी बाजारभाव मिळाला असल्याने या वर्षी कापसाच्या लागवडीत वाढ झाली आहे. शेतकरी बांधवांनी कापसाला चांगला बाजारभाव मिळेल या अनुषंगाने कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे.
मात्र कापसाला सध्या कवडीमोल दर मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी बांधव चिंतातुर झाला आहे. दरम्यान कापसाच्या उत्पादनात भली मोठी घट कडून येण्याचा अंदाज आहे. यामुळे उत्पादनात घट तर होणारच शिवाय बाजार भाव देखील कवडीमोल मिळत असल्याने कापसाच्या पिक शेतकऱ्यांना कर्ज बाजारी बनवून सोडणार आहे. दरम्यान, कापूस व्यापाऱ्यांनी बाजारात येत असलेला कापूस हा ओला आहे असे कारण पुढे करत कापसाचे बाजार भाव हाणून पाडले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
कापूस व्यापाऱ्यांच्या मते, सध्या कापसाला आठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा बाजार भाव मिळत आहे मात्र दिवाळीनंतर भाव वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी कापसाची विक्री बाजारपेठेचा आढावा घेऊन करावी असा सल्ला देखील व्यापाऱ्यांनी दिला आहे. निश्चितच आगामी काही दिवसात कापसाला काय बाजार भाव मिळतो यावर पुढील हंगाम अवलंबून असणार आहे.