Kapus Bajar Bhav : कापूस हे खरीप हंगामातील (Kharif Season) एक मुख्य पीक आहे. या पिकाची संपूर्ण महाराष्ट्रात लागवड (Cotton Farming) पाहायला मिळते. विशेषता खानदेश प्रांतात कापसाची (Cotton Crop) लागवड सर्वाधिक पाहायला मिळते. हेच कारण आहे की खानदेशला कापसाची पंढरी म्हणून देखील संबोधतात.
या कापसाच्या पंढरीतुन मुहूर्ताच्या सुरुवातीला कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी (Cotton Grower Farmer) एक मोठी आनंदाची बातमी समोर आली होती. कापसाचे माहेरघर किंवा पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यात मुहूर्ताच्या कापसाला तब्बल सोळा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा बाजारभाव (Cotton Market Price) मिळाला होता.
मुहूर्ताच्या कापसाला एवढा प्रचंड बाजार भाव (Cotton Rate) व्यापाऱ्यांनी दिल्यानंतर यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा अधिक बाजार भाव कापसाला मिळणार अशी आशा शेतकर्यांना होती. मात्र कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी चांगला गेम खेळला असून आता कापसाच्या बाजार भावात व्यापार्यांकडून मोठी कपात केली गेली आहे. सध्या बाजारात कापसाला साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास बाजार भाव मिळत आहे.
अशा परिस्थितीत खानदेशात कापसाची विक्री शेतकऱ्यांनी थांबवली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कापूस उत्पादक शेतकरी बांधवांच्या मते सध्या कापूस बाजारात नेला की कापसामध्ये ओलावा अधिक सांगून कापसाचे भाव पाडले जात आहेत. त्यामुळे कापसाची विक्री आता करण्यापेक्षा थोडे काळ थांबून कापसाची विक्री केल्यास अधिक बाजार भाव मिळणार आहे. जिनर्स व कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या कापसात ओलावा अधिक असल्याचे कारण पुढे केले जाते आणि कापसाचे भाव पाडले जातात असा एकंदरीत आरोप कापूस उत्पादकांनी केला आहे.
शेतकऱ्यांच्या मते गेल्या वर्षी देखील कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी सुरुवातीला कापसाचे भाव हाणून पाडले होते. मात्र शेतकरी बांधवांनी कापसाची साठवणूक केल्यानंतर बाजारपेठेत कमालीचा कापसाचा शॉर्टेज निर्माण झाला आणि परिणामी कापसाच्या बाजार भावात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली. यामुळे सध्या कापूस उत्पादक शेतकरी बांधव विक्री करण्याऐवजी साठवणूक करण्यास कडे वळले असल्याचे चित्र खान्देशातून समोर येत आहे. शेतकऱ्यांना दिवाळीनंतर कापसाच्या भाववाढीची आशा आहे यामुळे तूर्तास तरी कापसाची शेतकरी विक्री करत नसल्याचे समजत आहे.
एकीकडे, शेतकरी बांधव भविष्यात दर वाढणार याची आशा लावून बसला आहे. तर दुसरीकडे जिनर्स आणि व्यापारी एक वेगळाच तर्क देत भविष्यात देखील कापसाचे भाव वाढणार नसल्याचे सांगत आहेत. व्यापाऱ्यांच्या मते सध्याचे बाजारपेठेतील चित्र पाहता भविष्यात कापसाचे फारसे दर वाढणार नाहीत. मिलमध्ये कापसाची मागणी घटली असल्याने कापसाचे बाजार भाव वाढत नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान काही व्यापाऱ्यांनी भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला काय दर मिळतो त्यावर देशांतर्गत कापसाचा बाजार अवलंबून राहणार असल्याचे नमूद केले आहे.
एकंदरीत कापसाला गेल्या वर्षी सारखे दर मिळतात की यामध्ये अजून वाढ होते किंवा घट होते हे तर येणारा काळच सांगणार आहे. सध्या कापसाला सात हजार रुपये प्रतिक्विंटल ते साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव मिळत आहे. म्हणजे सध्या तरी कापसाला हमीभावापेक्षा अधिक बाजार भाव मिळत आहे. मात्र कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना बारा हजार रुपये प्रतिक्विंटल ते सोळा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत चा बाजार भाव मिळण्याची आशा आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, 2017 ते 2020 या तीन वर्षाच्या काळात चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये ट्रेड वॉर सुरु होते. आपण त्याला व्यापारी युद्ध असे म्हणू शकतो. या युद्धामुळे भारताच्या कापसावर मोठा विपरीत परिणाम होत होता. मात्र आता गेल्या वर्षीपासून कापसाच्या बाजारभावात सुधारणा झाली आहे कारण की चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील सुरू असलेल्या ट्रेड वॉर आता कुठेतरी पूर्णविराम घेताना पाहायला मिळत आहे.
या व्यतिरिक्त भारत सरकारने धूळ खात पडलेल्या सूतगिरण्यांना नवसंजीवनी देणे हेतू अनुदानात भरघोस वाढ केली आहे. त्यामुळे सूतगिरण्या मध्ये कापसाची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली असून यामुळे कापड उद्योगाला आपल्या देशात चालना मिळत आहे शिवाय याचा शेतकऱ्यांना देखील फायदा होत असून कापसाच्या बाजार भावात वाढ होण्याचे हे देखील एक कारण बनलं आहे. गेल्या वर्षी या दोन कारणांमुळे कापसाच्या बाजार भावात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली होती आणि कधी नव्हे तो ऐतिहासिक उच्चांकी बाजार भाव कापसाला मिळाला होता.
काही तज्ञांच्या मते या वर्षी तर गेल्या वर्षीपेक्षा अधिक बाजारभाव मिळू शकतो. तज्ञांच्या मते या वर्षी प्रमुख कापूस उत्पादक राष्ट्र पाकिस्तान आणि अमेरिकेत हवामान बदलामुळे कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे भारतीय कापसाला परत एकदा सुगीचे दिवस येणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कापसाला मोठी मागणी निर्माण होणार आहे.
हेच कारण आहे की या वर्षी कापसाच्या हंगामाच्या सुरवातीपासूनच कापसाला उच्चांकी बाजार भाव मिळत असून हमी भावापेक्षा अधिक बाजार भाव आता देखील मिळत आहे. आता येत्या काही महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची काय परिस्थिती राहते यावर भारतीय कापसाला काय बाजार भाव मिळतो हे निष्पन्न होणार आहे.