Kapus Bajar : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज मोठी चिंताजनक बातमी समोर येत आहे. खरं पाहता मकर संक्रांत नंतर कापूस दरात सुधारणा होईल असा दावा तज्ञांकडून केला जात होता. मात्र सद्यस्थितीला तज्ज्ञांचा हा दावा फोल ठरत असल्याचे चित्र आहे. या हंगामाच्या सुरुवातीला म्हणजे मुहूर्ताच्या कापसाला 14 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर खांदेशात नमूद करण्यात आला होता.
यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात चांगली कमाई होईल अशी आशा होती. मात्र त्यानंतर दरात घसरण झाली. मध्यंतरी 9,000 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी बाजारभाव महाराष्ट्रात नमूद केला जात होता. विशेष म्हणजे कमाल बाजारभाव 10 हजार रुपये प्रति क्विंटलच्या घरात पोहोचले होते.
मात्र डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात कापूस दराला ग्रहण लागलं अन बाजारभाव साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल वर येऊन ठेपलेत. दरम्यान नववर्षाच्या सुरुवातीला कापसाला आधार मिळण्यास सुरुवात झाली. साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा कमाल दर कापसाला मिळाला.
दरम्यान आज खानदेश मधील कापूस लिलावासाठी विशेष प्रसिद्ध यावल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला मात्र 7590 चा सरासरी दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी बांधव चिंतेत सापडला आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील प्रमुख बाजारात कापसाला काय भाव मिळाला आहे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
सावनेर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 4700 क्विंटल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 8100 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8350 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 8250 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
मनवत कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 1100 क्विंटल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 7600 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8520 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 8400 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
राजुरा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 135 क्विंटल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 8200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 8325 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
सिंदी- सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 900 क्विंटल लांब स्टेपल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 8350 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8445 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 8400 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
यावल कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 65 क्विंटल मध्यम स्टेपल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 7440 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 7850 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 7590 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.