Kanda Rate : लोकसभा निवडणुकीनंतर कांदा बाजार भावात सुधारणा झाली आहे. निवडणुकीआधी मात्र कांद्याचे दर दबावात होते. कांद्याला अगदीच कवडीमोल दर मिळत असल्याने अनेकांना पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता आला नाही. यामुळे सरकार विरोधात शेतकऱ्यांची नाराजी वाढली होती. लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला याचा फटका बसला आहे.
ज्या ठिकाणी कांद्याचे विक्रमी उत्पादन घेतले जाते तेथे महायुतीच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आता मात्र बाजारपेठांमध्ये कांद्याला चांगला दर मिळतोय. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळतोय. काल अर्थातच ६ जुलैला राज्यातील अनेक प्रमुख बाजारांमध्ये कांद्याला चांगला विक्रमी भाव मिळाला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील बाजारात सुद्धा कांदा भाव खात आहे. अशा परिस्थितीत आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख बाजारांमधील कांद्याचे बाजार भाव थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये काल कांद्याला किमान 300, कमाल 3500 आणि सरासरी 1900 रुपये भाव मिळाला आहे.
शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये एक नंबर कांद्याला किमान 2400, कमाल 3300 आणि सरासरी 2700 रुपये भाव मिळाला आहे. दोन नंबर कांद्याला या मार्केटमध्ये काल किमान दोन हजार, कमाल 2300 आणि सरासरी 2100 रुपये भाव मिळाला आहे. तीन नंबर कांद्याला या मार्केटमध्ये किमान 700, कमाल 1800 आणि सरासरी 1600 असा भाव मिळाला आहे.
अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये काल उन्हाळी कांद्याला किमान 700, कमाल 3000 आणि सरासरी 2450 असा भाव मिळाला आहे.
राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये काल उन्हाळी कांद्याला किमान 300, कमाल 3100 आणि सरासरी 2300 असा भाव मिळाला आहे.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये काल उन्हाळी कांद्याला किमान 1000, कमाल 3,087 आणि सरासरी 2825 असा भाव मिळाला आहे.
कोपरगाव शिरसगाव तिळवणी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात काल उन्हाळी कांद्याला किमान 1050, कमाल 3000 आणि सरासरी 2825 असा दर मिळाला आहे.
नेवासा घोडेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये काल उन्हाळी कांद्याला किमान 1000, कमाल 3000 आणि सरासरी 2500 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.