Kanda Niryat : महाराष्ट्रासहित देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरे तर केंद्र शासनाने डिसेंबर 2023 पासून कांदा निर्यात बंदी लागू केली आहे. अजूनही देशात कांदा निर्यात बंदी लागू आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपूर्वी केंद्रातील सरकारने गुजरात राज्यातून 2000 टन पांढरा कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली होती. केंद्राने हा निर्णय घेतल्यानंतर सरकारच्या या निर्णयावर चहूबाजूने हल्ला चढवला गेला.
राज्यातील अनेक नेत्यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये देखील केंद्राच्या या निर्णयाविरोधात नाराजी पाहायला मिळत होती.
शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या माध्यमातून सरकारने निर्यात बंदी पूर्णपणे उठवली पाहिजे आणि संपूर्ण देशभरातील कांदा उत्पादकांना दिलासा दिला गेला पाहिजे अशी मागणी केली जात होती.
दरम्यान सरकारने गुजरातमधून 2 हजार टन पांढरा कांदा निर्यात करण्यास परवानगी दिल्यानंतर जी टिका झाली होती त्यानंतर आता सरकारच्या माध्यमातून आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने आता महाराष्ट्रासहित इतर राज्यांमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी बांगलादेश, यूएई, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशांना 99,150 मॅट्रिक टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे.
दरम्यान सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून समाधान व्यक्त केले जात आहे. तथापि सरकारने पूर्णपणे निर्यात बंदी उठवली पाहिजे अशी देखील मागणी शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून आणि कांदा उत्पादकांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
दुसरीकडे, काही शेतकरी नेत्यांनी निवडणुका डोळ्यापुढे ठेवून सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. तथापि, सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळू शकतो असे बोलले जात आहे.
यामुळे कांदा बाजार भावात वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. निश्चितच जर असे घडले तर कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गेली अनेक महिने शेतकऱ्यांनी अगदी कवडीमोल दरात कांद्याची विक्री केली आहे. यामुळे आता जर बाजार भाव सुधारले तर याचा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे.