Kanda Market Rate : डिसेंबर 2023 पासून कांद्याचे बाजारभाव दबावात होते. कारण म्हणजे केंद्रातील सरकारने कांदा निर्यात बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. 7 डिसेंबर 2023 ला केंद्रातील मोदी सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतला. तेव्हापासून कांद्याचे बाजारभाव गडगडले होते. अक्षरशा पिकासाठी आलेला खर्च देखील शेतकऱ्यांना भरून काढता येत नव्हता.
यामुळे केंद्रातील सरकार विरोधात देशभरातील कांदा उत्पादकांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळाली होती. दरम्यान, शेतकऱ्यांची हीच नाराजी दूर करण्यासाठी नुकताच केंद्रातील मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला असून पुन्हा एकदा कांदा निर्यात सुरू करण्यात आली आहे.
कांदा निर्यात सुरू झाली असल्याने कांदा बाजारभावात थोडी का होईना पण सुधारणा पाहायला मिळत आहे. काल तर राज्यातील कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला कमाल 2600 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला होता.
कालच्या लिलावात कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5 हजार 707 क्विंटल कांदा आवक झाली होती. या कांद्याला काल किमान 700, कमाल 2600 आणि सरासरी 1400 रुपये असा भाव कोल्हापूरच्या बाजारात मिळाला. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसानंतर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले आहे.
राज्यातील काही बाजारांमध्ये कांद्याला समाधानकारक असा दर मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला असून कांदा निर्यात अशीच सुरू राहिली तर बाजारभावात आणखी वाढ होईल अशी आशा देखील आता वाटू लागली आहे.
यामुळे सरकारने कांदा निर्यात अशीच सुरू ठेवावी अशी मागणीही उत्पादकांच्या माध्यमातून केली जात आहे. दरम्यान आता आपण आज राज्यातील बाजारांमध्ये कांद्याला नेमकं काय भाव मिळाला आहे ? याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कुठे मिळाला विक्रमी भाव ?
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर एपीएमसी मध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 300, कमाल 2400 आणि सरासरी 1450 असा भाव मिळाला आहे.
राहता कृषी उत्पन्न बाजार समिती : नगर जिल्ह्यातील राहता एपीएमसी मध्ये आज कांद्याला किमान 350, कमाल 2200 आणि सरासरी 1500 रुपये भाव मिळाला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 700, कमाल 2100 आणि सरासरी 1400 रुपये भाव मिळाला आहे.
सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 1500, कमाल 2000 आणि सरासरी 1750 रुपये असा भाव मिळाला आहे.
पुणे पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समिती : पुण्यातील या मार्केटमध्ये कांद्याला किमान 1200, कमाल 2000 आणि सरासरी 1600 रुपये भाव मिळाला आहे.