Kanda Market News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळत आहे. कांद्याचे बाजार भाव पुन्हा एकदा तेजीत आले आहेत तसेच आजही राज्यातील प्रमुख बाजारात दरात तेजीच होती. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.
तब्बल पाच ते सहा महिने म्हणजे फेब्रुवारी ते जून या कालावधीमध्ये अगदी कवडीमोल भावात कांदा विकल्यानंतर आता कुठे शेतकऱ्यांना दिलासा मिळू लागला आहे. वास्तविक जुलै आणि ऑगस्ट महिन्यात देखील कांद्याचे भाव वाढले होते. ऑगस्ट महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात कांद्याला चांगला विक्रमी भाव मिळत होता.
मात्र गेल्या महिन्यात केंद्र शासनाने कांदा निर्यातीसाठी 40 टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे मालाची निर्यात मंदावली आहे. परिणामी कांद्याचे दर गेले काही दिवस घसरत होते. पण आता पुन्हा एकदा कांद्याच्या दरात उसळी आली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
वास्तविक कांदा हे एक नगदी पीक म्हणून ओळखले जाते. या पिकाची राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड होते. याव्यतिरिक्त विदर्भ, मराठवाडा समवेतच उत्तर महाराष्ट्रातही या पिकाची लागवड केली जाते. एकंदरीत या पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे.
अशा स्थितीत सध्या कांदा बाजार भावात आलेली तेजी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. दरम्यान आज देखील राज्यातील काही बाजारात कांद्याला चांगला भाव मिळाला आहे. आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
राज्यातील कोणत्या बाजारात मिळाला कांद्याला सर्वोच्च भाव
पेन कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज 261 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 3200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, 3400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव मिळाला होता.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज 6287 क्विंटल कांदा आवक झाली. या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान एक हजार रुपये, कमाल 2700 आणि सरासरी 1900 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज साडेआठ हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला किमान 800, कमाल 2599 आणि सरासरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला.