Kanda Market News : काल अर्थातच 17 एप्रिल 2024 ला प्रभू श्रीराम जयंती दिनानिमित्त अर्थातच श्री राम नवमी निमित्ताने कांद्याचे लिलाव बंद होते. आज मात्र राज्यातील बहुतांशी बाजारांमध्ये कांद्याची आवक झाली होती. खरं तर केंद्रातील मोदी सरकारने नुकताच मोठा निर्णय घेतला आहे.
केंद्राने पुन्हा एकदा यूएई आणि श्रीलंका या दोन्ही देशांना प्रत्येकी दहा हजार टन अर्थातच एकूण 20 हजार टन कांदा निर्यातीस परवानगी दिलेली आहे. खरे तर सध्या संपूर्ण देशभरात कांदा निर्यात बंदी लागू आहे. सुरवातीला निर्यात बंदीचा निर्णय सात डिसेंबर 2023 ला घेतला गेला.
त्यावेळी केंद्रातील सरकारने 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यात बंदी सुरू राहील असे म्हटले होते. मात्र नंतर सरकारने एक अधिसूचना काढली आणि निर्यात बंदीचा निर्णय जोपर्यंत पुढील आदेश प्राप्त होत नाही तोपर्यंत कायम राहणार असे म्हटले.
अर्थातच आता जोपर्यंत पुढील आदेश येत नाहीत तोपर्यंत निर्यात बंदी सुरूच राहणार आहे. मात्र निर्यात बंदी सुरू असली तरी देखील सरकारने आपल्या मित्र राष्ट्रांना कांदा निर्यात करण्यास परवानगी दिलेली आहे. यानुसार श्रीलंका आणि UAE या दोन देशांना 20000 टन कांदा पाठवला जाणार आहे.
दरम्यान, या निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार नसल्याचा युक्तिवाद केला जात आहे. कारण की, UAE आणि श्रीलंका या देशांना एनसीईएल या सरकारी कंपनीच्या माध्यमातून निर्यात केली जाणार आहे.
यामुळे याचा शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना तथा निर्यातदारांना कोणता फायदा होणार नसल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान आज आपण श्रीलंका आणि युएई या देशांना कांदा निर्यातीचा निर्णय घेतल्यानंतर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळत आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
छत्रपती संभाजी नगर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला किमान चारशे रुपये, कमाल 1300 रुपये आणि सरासरी 850 रुपयाचा भाव मिळाला आहे.
धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती : येथे कांद्याला किमान 100, कमाल 1370 आणि सरासरी बाराशे रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : येथे कांद्याला किमान 1100, कमाल 1300 आणि सरासरी 1200 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : येथे कांद्याला किमान 600, कमाल 1700 आणि सरासरी 1200 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान एक हजार, कमाल पंधराशे रुपये आणि सरासरी 1250 रुपयाचा भाव मिळाला आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 600, कमाल 1500 आणि सरासरी 1375 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 567 रुपये प्रति क्विंटल, कमाल 1467 रुपये आणि सरासरी 1017 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला आहे.