Kanda Market News : यंदाचा दसरा राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूपच खास राहिला आहे. विजयादशमी अर्थातच दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यातील काही बाजारात मुहूर्ताच्या लाल कांद्याला चांगला विक्रमी भाव मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजयादशमीच्या मुहूर्तावर नासिक जिल्ह्यातील देवळा येथील खारीफाटा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे लाल कांद्याला तब्बल अकरा हजार 111 रुपये प्रतिक्विंटल एवढा विक्रमी भाव मिळाला आहे.
याशिवाय जिल्ह्यातील उमराणे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे लाल कांद्याला 9 हजार 111 रुपये प्रति क्विंटल एवढा विक्रमी दर देण्यात आला होता. यावरून आता कांद्याच्या बाजारभावात वाढ होणार हे जवळपास स्पष्ट झाले होते. नवरात्र उत्सवात देशांतर्गत कांद्याची मागणी कमी झाल्यामुळे काही काळ भाव वाढीसाठी पोषक परिस्थिती असताना देखील बाजारभावात वाढ होत नव्हती.
मात्र आता नवरात्र उत्सवाचा काळ संपला असून देशांतर्गत कांद्याची मागणी वाढली आहे. जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे नवरात्र उत्सव हा हिंदू सनातन धर्मात खूपच पवित्र मानला जातो. नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसांच्या काळात हिंदू सनातन कुटुंबात मांसाहाराचे सेवन होत नाही. एवढेच नाही तर मद्यपान आणि कांदा, लसूण सारख्या वस्तूंचे देखील हिंदू कुटुंबात नवरात्र उत्सवाच्या काळात सेवन केले जात नाही.
याचा परिणाम म्हणून नवरात्र उत्सवात नेहमीच कांद्याची मागणी कमी होते. पण आता नवरात्र उत्सव संपला आहे यामुळे कांद्याची मागणी वाढत आहे. देशांतर्गत कांद्याची मागणी वाढत आहे शिवाय निर्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचा परिणाम म्हणून आता बाजारभावात विक्रमी तेजी आली आहे. काल देखील राज्यातील अनेक महत्त्वाच्या बाजारात कांद्याला विक्रमी भाव मिळाला आहे.
कुठं मिळाला विक्रमी दर ?
मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये काल 26 ऑक्टोबर रोजी 13751 क्विंटल कांदा आवक झाली. कालच्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला किमान 3000, कमाल 7110 रुपये आणि सरासरी 5,055 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये काल 14 हजार 945 क्विंटल लाल कांदा आवक झाली. कालचा लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला किमान 200 कमाल 7000 आणि सरासरी 3200 प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला.
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती : कालच्या लिलावात या मार्केटमध्ये लाल कांद्याला किमान 400, कमाल 6500 आणि सरासरी 3600 रुपये एवढा भाव मिळाला आहे.
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये काल 26 ऑक्टोबर रोजी चिंचवड कांद्याला किमान दोन हजार, कमाल 6500 आणि सरासरी 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.
सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती : सिन्नर एपीएमसी मध्ये काल उन्हाळी कांद्याला किमान दोन हजार, कमाल 6401 आणि सरासरी चार हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल एवढा भाव मिळाला आहे.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल 3874 क्विंटल कांदा आवक झाली होती. या मार्केटमध्ये काल कांद्याला किमान 2000, कमाल 6300 आणि सरासरी 3600 एवढा भाव मिळाला.
अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये काल 38,604 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली होती. कालच्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला किमान 1200, कमाल 6000 आणि सरासरी 3900 रुपये एवढा विक्रमी भाव मिळाला होता.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला किमान 500 कमाल, 6 हजार 11 आणि सरासरी 3255 प्रतिक्विंटल एवढा भाव मिळाला आहे.