Kanda Market News : गेल्या काही वर्षांमध्ये शेती हा व्यवसाय खूपच आव्हानात्मक बनला आहे. एकतर नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित असे उत्पादन मिळत नाहीये. जर नैसर्गिक संकटांशी यशस्वी झुंज देऊन शेतकऱ्यांनी पिकातून चांगले उत्पादन घेतले तर बाजारात शेतमालाला अपेक्षित असा भाव मिळत नाहीये.
यामुळे शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी पाहायला मिळत आहे. एकीकडे आड तर दुसरीकडे विहीर अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. सध्या कांदा पिकाबाबत देखील तसेच काहीस घडतं आहे. सरकारच धोरण अन शेतकऱ्यांचे मरण अशी परिस्थिती कांद्याच्या बाबतीत तयार झाली आहे. खरंतर यावर्षी मानसून काळात खूपच कमी पाऊस बरसला असल्याने लाल कांदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे.
उत्पादन घटले आहे मात्र बाजार भाव चांगले मिळतील अशी आशा तयार झाली होती. गेल्या काही दिवसांपर्यंत कांद्याचे दर चांगले तेजीत होते. कांद्याचे कमाल बाजारभाव तब्बल सहा हजार रुपये प्रति क्विंटल ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहचले होते. यामुळे राज्यातील कांदा उत्पादकांना तब्बल जून महिन्यापर्यंत अगदी कवडीमोल दरात कांदा विकल्यानंतर आता कुठे खऱ्या अर्थाने दिलासा मिळू लागला होता.
पण शेतकऱ्यांना मिळणारा हा दिलासा शासनाला सहन झाला नाही. शेतकऱ्यांना थोडेफार पैसे मिळतील तोच केंद्र शासनाने किरकोळ बाजारातील किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी दोन महत्त्वाचे निर्णय घेतलेत. केंद्र शासनाने बफर स्टॉक मधील कांदा किरकोळ बाजारात 25 रुपये प्रति किलो या दरात विकण्याचा निर्णय घेतला.
केंद्र शासन जवळपास 2 लाख मेट्रिक टन कांदा किरकोळ बाजारात 25 रुपये प्रति किलो प्रमाणे विकणार आहे. याची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. सोबतच केंद्र शासनाने कांदा निर्यात मूल्य आठशे डॉलर प्रति टन पर्यंत वाढवण्याचे जाहीर केले आहे. आधी हे निर्यात मूल्य 400 डॉलर प्रति टन एवढे होते.
म्हणजेच यामध्ये दुपटीने वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचा परिणाम असा झाला की कांदा निर्यात मोठ्या प्रमाणात मंदावली आहे.एकीकडे निर्यात कमी झाली आहे तर दुसरीकडे देशांतर्गत बफर स्टॉक मधील कांदा सरकारकडून कमी दरात विकला जात असल्याने यामुळे देशातील कांद्याची मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक होऊ लागला आहे.
हेच कारण आहे की कांदा बाजार भाव आता मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. कांद्याचे बाजारभाव 2 हजार ते तीन हजार रुपयांवर येऊन ठेपले आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोदीचे धोरण आणि शेतकऱ्यांचे मरण अशी गत झाल्याचे बोलले जात आहे. शेतकरी बांधव केंद्रातील मोदी सरकारच्या निर्णयावर कडाडून आणि सडकून टीका करू लागले आहेत. दरम्यान आता आपण कालच्या लिलावात राज्यातील प्रमुख बाजारात कांद्याला काय भाव मिळाला आहे याविषयी सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कांद्याला काय भाव मिळतोय ?
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला किमान 500, कमाल 4200 आणि सरासरी 2350 एवढा भाव मिळाला आहे.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याचे भाव किमान 2200, कमाल 4250 आणि सरासरी 3225 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
राहता : या मार्केटमध्ये कांदा किमान 1300, कमाल 4200 आणि सरासरी 2800 या भावात विकला गेला आहे.
जुन्नर एपीएमसी : या मार्केटमध्ये कांदा किमान 1000, कमाल 4510 आणि सरासरी 3000 अशा भावात विकला गेला आहे.
जुन्नर नारायणगाव : जुन्नर एपीएमसी अंतर्गत येणाऱ्या या उपबाजारात कांदा किमान 500, कमाल 4000 आणि सरासरी 2000 या बाजारभावात विकला गेला आहे.
जुन्नर आळेफाटा : या मार्केटमध्ये कांदा किमान 1000 कमाल 4110 आणि सरासरी 2500 या भावात विकला गेला आहे.
पुणे एपीएमसी : या मार्केटमध्ये कांदा किमान 2000, कमाल 4000 आणि सरासरी 3000 या भावात विकला गेला आहे.
पुणे पिंपरी एपीएमसी : या मार्केटमध्ये कांदा किमान 2500, कमाल 4500 आणि सरासरी 3500 या भावात विकला गेला आहे.
जुन्नर ओतूर : जुन्नर एपीएमसी अंतर्गत येणाऱ्या ओतूरच्या उप बाजारात कांदा किमान दोन हजार, कमाल 4210 आणि सरासरी 3500 या भावात विकला गेला आहे.
कोपरगाव एपीएमसी : या मार्केटमध्ये कांदा किमान 1000, कमाल 3800 आणि सरासरी 3501 या भावात विकला गेला आहे.
पारनेर एपीएमसी : या बाजारात कांदा किमान 700, कमाल 4500 आणि सरासरी 3100 याबाबत विकला गेला आहे.