Kanda Market Maharashtra 2023 : यावर्षी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असे चित्र तयार होत आहे. कारण की कांदा बाजार भावात काल अर्थातच सहा नोव्हेंबर 2023 रोजी राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये मोठी वाढ नमूद करण्यात आली आहे.
वास्तविक गेल्या काही दिवसांपूर्वी कांदा दरात तेजी आली होती. पण बाजारभावातील ही वाढ शासनाला सहन झाली नाही.
केंद्र शासनाने किरकोळ बाजारातील किमती कमी करण्याच्या बहाण्याने बफर स्टॉक मधील दोन लाख मेट्रिक टन कांदा 25 रुपये प्रति किलो या बाजारभावात किरकोळ बाजारात विकण्याचा निर्णय घेतला आहे.
सोबतच कांद्याचे किमान निर्यात मूल्य 800 डॉलर प्रति टन एवढे वाढवण्यात आले आहे. याचा परिणाम म्हणून देशांतर्गत कांद्याची मुबलक उपलब्धता तयार झाली असून यामुळे कांदा दर वाढीला ब्रेक लागला आहे.
विशेष म्हणजे काही ठिकाणी कांद्याच्या बाजारभावात या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात घसरनही झाली आहे. यामुळे शासनाच्या या शेतकरी विरोधी धोरणाचा राज्यातील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे.
सध्या मोदीचे धोरण आणि शेतकऱ्यांचे मरण असे बोलले जात आहे. कांदा बाजारभावात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत असल्याने यंदाची शेतकऱ्यांची दिवाळी संकटातच जाणार असे चित्र तयार झाले होते.
पण काल अर्थातच 6 नोव्हेंबर रोजी राज्यातील काही बाजारसमित्यांमध्ये बाजारभावात सुधारणा झाली आहे. कालच्या लिलावात कामठी एपीएमसीमध्ये कांद्याला साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे.
तसेच राज्यातील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल भाव मिळाला आहे. पण बाजारात अचानक आलेली ही तेजी किती दिवस टिकेल याबाबत आशँका व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे बाजारातील ही तेजी या दोन मार्केटमध्येच पाहायला मिळाली. उर्वरित बाजार समितीमध्ये अजूनही बाजार भाव दबावातच आहेत. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी यंदा खरंच गोड होईल का हा मोठा सवाल अजूनही कायमच आहे.
कुठं मिळाला विक्रमी भाव
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, काल या बाजारात लाल कांद्याला किमान शंभर, कमाल 6000 आणि सरासरी 3200 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे. तसेच कालच्या लिलावात या मार्केटमध्ये लाल कांद्याची 17802 क्विंटल एवढी आवक झाली होती.
कामठी कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये काल 14 क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली होती. कालच्या निलावा त्या मार्केटमध्ये कांद्याला किमान 5500, कमाल 6500 आणि सरासरी 6000 एवढा भाव मिळाला आहे.