Kanda Market Maharashtra : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात नुकताच दिवाळीचा मोठा सण साजरा झाला आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध बाजार समित्या वेगवेगळ्या कालावधीसाठी बंद करण्यात आल्या होत्या.
यामध्ये नासिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती देखील दीपोत्सवाच्या सणानिमित्त तब्बल बारा दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
लासलगाव एपीएमसी ही आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजार पेठ म्हणून ओळखली जाते. ही बाजार समिती दिवाळी तब्बल 12 दिवसांसाठी बंद करण्यात आली असल्याने परिसरातील कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे.
मात्र आता दीपोत्सवाच्या सणानंतर ही बाजारपेठ पुन्हा एकदा लिलावासाठी सज्ज झाली आहे. पुन्हा एकदा बाजार समिती गजबजली आहे.
ही एपीएमसी 20 नोव्हेंबर पासून पुन्हा एकदा कांदा लिलावासाठी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे बाजारात कांद्याचे लिलाव सुरू झाल्याबरोबर येथे बाजार भावात सुधारणा झाली आहे.
या एपीएमसी मध्ये वीस तारखेला झालेल्या लिलावात लाल कांद्याच्या बाजारभावात तब्बल 1600 रुपये प्रति क्विंटल एवढी वाढ झाली आहे.परंतु उन्हाळी कांदा बाजार भावात 200 रुपयांपर्यंतची घसरण नमूद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 6 नोव्हेंबर 2023 ला या एपीएमसी मध्ये लाल कांद्याला कमाल 3501 रुपये एवढा भाव मिळाला होता. तसेच उन्हाळ कांद्याला कमाल 4000 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला होता.
तर 20 नोव्हेंबर 2023 ला या एपीएमसी मध्ये लाल कांद्याला कमाल 4 हजार 101 रुपये, सरासरी तीन हजार तीनशे रुपये आणि किमान दोन हजार एवढा भाव मिळाला आहे.
तसेच उन्हाळी कांद्याला कमाल 4545 आणि सरासरी चार हजार रुपये एवढा भाव मिळाला आहे. म्हणजेच लाल कांद्याच्या कमाल बाजार भावात जवळपास 700 रुपयांची वाढ झाली आहे.
दरम्यान कांदा बाजारभावात वाढ झाली असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये थोडेसे समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.